शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : घंटागाडी कर्मचाऱ्याची चक्क नोटांची माळ घालून ओवाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 21:23 IST

सावंतवाडीकरांकडून गुरुवारी वेगळीच अनुभूती पहायला मिळाली. एरव्ही घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या येथील पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे चक्क नोटांची माळ घालून, तसेच ओवाळून येथील सबनीसवाडा भागातील नागरिकांनी आभार मानले.

ठळक मुद्देघंटागाडी कर्मचाऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थापनागरिकांनी गळ्यात घातल्या नोटांच्या माळा

सावंतवाडी : सावंतवाडीकरांकडून गुरुवारी वेगळीच अनुभूती पहायला मिळाली. एरव्ही घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या येथील पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे चक्क नोटांची माळ घालून, तसेच ओवाळून येथील सबनीसवाडा भागातील नागरिकांनी आभार मानले. तसेच यापुढेसुद्धा अशाच पध्दतीने सेवा बजवावी, अशी मागणी त्यांनी या कर्मचाऱ्यांकडे केली.

लोकांचे प्रेम पाहून त्या घंटागाडी कर्मचाऱ्यांलासुध्दा एक सुखद धक्का बसला. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून घरात रहा, असे आवाहन करण्यात येते. मात्र सावंतवाडी पालिकेचे स्वच्छता करणारे कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येथील सबनीसवाडा भागात राहणाऱ्या नागरिकांनी एक अनोखी शक्कल लढविली. घरोघरी जाऊन पैसे जमा केले. त्यातून त्या कर्मचाऱ्यांला आवश्यक असलेले नवे कपडे, मास्क आदी साहीत्य तर दिलेच शिवाय एवढ्यावरच न थांबता त्याला चक्क नोटांची माळ घालून ओवाळणी करण्यात आली.यावेळी नागरिकांचे अशा प्रकारचे अनोखे प्रेम पाहून त्या कर्मचाºयाला सुखद धक्का बसला. यावेळी प्रमोद वाडकर, अभय माईणकर, अतुल माईणकर, वासुदेव शितोळे, पुष्पक माठेकर, प्रणाली वाडकर, प्रतिज्ञा वाडकर, पौर्णिमा माठेकर, अपर्णा शितोळे, विशाल शितोळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग