शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

शिवसेनेतूनच भरा नगराध्यक्षपदाचा अर्ज

By admin | Updated: October 26, 2016 22:47 IST

बबन साळगावकरांना आग्रह : नगरसेवकांचाही पाठिंबा; आज निर्णय

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : सावंतवाडी नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पक्ष प्रवेशाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत असतानाच बुधवारी सावंतवाडी नगरपरिषदेतील सर्व नगरसेविका, नगरसेवक, शहरातील नागरिकांनी साळगावकर यांची भेट घेऊन शिवसेनेतूनच नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरावा, असा आग्रह धरला. मात्र, साळगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलून आज, गुरुवारी निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.सावंतवाडी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असून, विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, सावंतवाडी येथील पाटील कॉम्प्लेक्स येथे सावंतवाडी नगरपरिषदेतील नगरसेविका, नगरसेवक, शहरातील प्रतिष्ठित व सर्वसामान्य नागरिकांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची अचानक भेट घेतली.सावंतवाडी नगरपरिषदेतील सर्व सत्ताधारी नगरसेवकांनी शहरातील नागरिकांसमवेत शक्तिप्रदर्शन करून पाठिंबा दर्शविला व आपण शिवसेनेतूनच नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करावा, असा अट्टहास धरला. यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनीही नगराध्यक्ष बबन साळगावकरच शिवसेनेतून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून आज अर्ज दाखल करणार असल्याचे लोबो यांनी सांगितले. यावेळी आम्हाला तेच नगराध्यक्ष पाहिजेत, अशी सर्व नागरिक, नगरसेवक यांनी भूमिका घेतली.गेल्या कित्येक महिन्यांपासूनचीे शहरवासीयांची संभ्रमता दूर होणार असून, अखेर नगराध्यक्ष बबन साळगावकर शिवसेनेचाच झेंडा हातात घेण्याची शक्यता आहे. आपण पुन्हा नगराध्यक्ष होण्याची जनतेचीच इच्छा आहे. मी जनतेचा अनादर करणार नाही व जनतेच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेणार असल्याचे साळगावकर यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे, क्षिप्रा सावंत, शुभांगी सुकी, अफरोज राजगुरू, साक्षी कुडतरकर, नगरसेवक विलास जाधव, संजय पेडणेकर, देवेंद्र्र टेमकर, बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, रेमी आल्मेडा, रॉबर्ड आल्मेडा, गुरू वारंग, बाबल्या दुभाषी, सीताराम गावडे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)साळगावकरांची केसरकरांना गुगलीपालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी मंगळवारी रात्री चर्चा झाली. यामध्ये शिवसेनेत जायचा विषयच आला नाही. यावेळी निवडणूक न लढविण्याचा विचार करून थांबायचा निर्णय घेतला आहे. उपनगराध्यक्ष राजन पोकळे इच्छुक असतील, तर त्यांना तिकीट द्या, असे मी दीपक केसरकर यांना सांगितले आहे. त्यामुळे राजन पोकळे यांचा सन्मान करा, असेही साळगावकर यांनी सांगितले.