शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शहरवासिय म्हणाले गोव्यातील लोकांना प्रवेश बंद करा... येथूनच महाराष्ट्र हद्द सुरु होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 17:03 IST

दोडामार्ग : गोवा सरकारने राज्यात शिथिलता करून राज्य सिमांंवर कडक बंदोबस्त करून महाराष्ट्रवासीयांना गोवा राज्यात नो एन्ट्री घोषित केली. ...

ठळक मुद्देगोव्याच्या हद्दीवरील नागरिकांना दोडामार्ग शहरात प्रवेश देऊ नये

दोडामार्ग : गोवा सरकारने राज्यात शिथिलता करून राज्य सिमांंवर कडक बंदोबस्त करून महाराष्ट्रवासीयांना गोवा राज्यात नो एन्ट्री घोषित केली. त्यामुळे राज्याच्या सीमेवर असलेल्या  दोडामार्ग  शहरवासीयांनी गोव्याच्या हद्दीवरील गावातील नागरिकांना शहरात प्रवेश देऊ नये. त्यांनाही महाराष्ट्रात येण्यास बंदी करावी. तसेच एखादी व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात यावी अशी मागणी नगरपंचायत प्रशासनाकडे शहरवासीयांनी केली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्याने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. गोवा कोरोनामुक्त झाल्यानंतर राज्यात शिथिलता करण्यात आली. मात्र पुन्हा कोरोनाचा शिरकाव गोव्यात होऊ नये यासाठी सरकारने कमालीची खबरदारी घेत राज्याच्या सीमा मात्र सील केल्या आहेत. त्याचा फटका राज्याच्या सीमेवर असलेल्या दोडामार्ग शहराला बसत आहे. गोव्याला लागून महाराष्ट्राची सीमा आहे. आणि दोडामार्ग शहरापासून त्याची सुरुवात होते. 

साहजिकच दोन्ही राज्याच्या सीमेवरील गावातील नागरी एकमेकांवर अवलंबून आहेत. गोव्यातील साळ, खोलपे, साळ पुन., गोवा दोडामार्ग,  खरपाल, कुमयामळा, आदी  गावातील नागरिकांना दोडामार्ग बाजारपेठ लागते. तर दोडामार्गमधील वाहन चालक पेट्रोल व डिझेलसाठी गोव्याच्या सिमेत हाकेच्या अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर अवलंबून आहेत.

मात्र, दोन्हीकडील राज्यांनी मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस नाके उभारले आहेत. त्यामुळे दोन्हीकडील नागरिक साळ  पुनर्वसन मार्गे व कालव्याद्वारे ये-जा करत  असत. मात्र आता खोलपे व साळ पुनर्वसन मधील नागरिकांनी ये-जा करण्याची वाटच बंद केली. व गोवा शासनास त्याची माहिती देऊन त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला. त्यामुळे दोडामार्गमधून जाणाºया नागरिकांची गैरसोय होत आहे. परंतु असे असले तरी दोडामार्ग शहराची हद्द मात्र खुलीच आहे. त्यामुळे गोवा सरकार जर  पेट्रोल व तत्सम गोष्टींसाठी आडमुठे धोरण स्वीकारत असेल तर महाराष्ट्रातही गोव्याच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नये, अशी मागणी शहरवासीयांनी नगरपंचायत प्रशासनाकडे केली.

यावेळी ग्रामस्थांनी पाटील यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. पाटील यांनी अशा चोरवाटा बंद करण्याबाबत पोलिसांना कळविले जाईल व निश्चितच गोव्याच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली.    

 

गोव्यातून मालवणात आलेल्यावर गुन्हा दाखल

मालवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना गोवा-म्हापसा येथून पायी शहरातील मेढा कोथेवाडा येथे दाखल झालेल्या गणेश प्रभाकर परब  (३८) या तरूणावर येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत काहीजण चोरट्या मार्गाने जिल्ह्यात दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वीही आंब्यांच्या गाड्यांमधून तसेच अन्य मार्गाने जिल्ह्यात दाखल झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यातच गोवा-म्हापसा येथून २० तारखेला निघालेला गणेश प्रभाकर परब हा तरूण २२ तारखेला सकाळी शहरातील मेढा कोथेवाडा येथे दाखल झाला. याची माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना मिळताच त्यांनी त्याचा शोध घेत आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना केल्या. मात्र त्याने सुरुवातीस नकार दिला. याची माहिती पोलिसांना देताच पोलीस कर्मचारी कैलास ढोले, प्रसाद आचरेकर यांनी त्यांच्या घरी जात योग्य समज दिल्यानंतर त्याने आरोग्य तपासणी करून घेतली. त्यानंतर त्याची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे अधिक तपास करत आहेत.

 

 

टॅग्स :konkanकोकणgoaगोवाsindhudurgसिंधुदुर्गroad transportरस्ते वाहतूक