शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या जहाजामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये : प्रीतेश राऊळ यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:33 IST

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीन येथून रेडी येथे लोह खनिज नेण्यासाठी आलेल्या जहाजामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून मुंबई येथे २८ जानेवारी रोजी या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची भारत सरकार आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली असून याबाबतचे अहवाल त्यांच्याजवळ देण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे चीनच्या जहाजामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये : प्रीतेश राऊळ यांचे आवाहनकर्मचाऱ्यांची मुंबईत तपासणी; जिल्हा आरोग्य यंत्रणाही सतर्क

वेंगुर्ला : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीन येथून रेडी येथे लोह खनिज नेण्यासाठी आलेल्या जहाजामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून मुंबई येथे २८ जानेवारी रोजी या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची भारत सरकार आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली असून याबाबतचे अहवाल त्यांच्याजवळ देण्यात आले आहेत.

याशिवाय जिल्हा आरोग्य यंत्रणासुद्धा सतर्क असून रेडी पोर्ट प्रशासनाकडून सर्व कामगारांना मास्क पुरविले आहेत. तसेच त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य तथा माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी दिली आहे.चीनमधील अनेकांचे बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.दरम्यान, रेडी येथे लोहखनिज नेण्यासाठी चीनमधून जहाज सध्या रेडी बंदरात पोहोचले आहे. या जहाजावर कप्तानासह २२ कर्मचारी असून त्यातील १० कर्मचारी चीन येथील आहेत. तसेच २२ आॅक्टोबरपासून हे जहाज चीनच्या बाहेर असून इंडोनेशिया, आफ्रिका, सिंगापूर, मुंबई करीत रेडी येथे दाखल झाले आहे.

हे जहाज जेटीपासून ४ नॉटिकल आत समुद्रात असल्याने व त्या जहाजावर असलेल्या कामगारांपैकी बहुतांश चिनी कामगार हे महिन्याभरापूर्वीच जहाजावर आल्याने हा कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता कमी आहे.

सिमशुल्क विभाग, जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत सर्व खबरदारी घेत आहे. रेडी येथील स्थानिक कामगारही त्या जहाजावर गेले असून त्यांचे तसेच जहाजावरील सर्व कामगारांची रोज तपासणी करण्यात येणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाsindhudurgसिंधुदुर्ग