शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिउलुआन पोहोचला मुक्कामी! सर्वात लांब प्रवास करणारा स्थलांतरित पक्षी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 07:18 IST

- संदीप बोडवे मालवण ( सिंधुदुर्ग ) :  दोन महिन्यांत तब्बल १३ हजार किलोमीटर प्रवास करून चिउलुआन-२ नावाचा अमुर ...

- संदीप बोडवेमालवण (सिंधुदुर्ग) :  दोन महिन्यांत तब्बल १३ हजार किलोमीटर प्रवास करून चिउलुआन-२ नावाचा अमुर फाल्कन पक्षी अखेर दक्षिण आफ्रिकेतील यंदाच्या आपल्या मुक्कामावर सुखरूप पोहोचला आहे. जोहान्सबर्गच्या पश्चिमेला सुमारे १६० किलोमीटरवर त्याने आपला मुक्काम ठोकला आहे. याठिकाणी तीन महिन्यांच्या पाहुणचारानंतर चिउलुआन-२ परतीच्या प्रवासाला निघणार असल्याचे डब्ल्यूआयआयकडून सांगण्यात आले.

सर्वात लांब प्रवास करणारा स्थलांतरित पक्षी अमुर फाल्कन (ससाणा) ही जगातील सर्वात लांब प्रवास करणारा स्थलांतरित पक्षी  आहे. चीन, भारत, कोकणातून अरबी समुद्रमार्गे हा पक्षी आफ्रिकेला पोहोचला आहे.मणिपूर वनविभाग व डब्ल्यूआयआयच्या विशेष पथकाने ८ नोव्हेंबर रोजी मणिपूरच्या तामेंगलाँग जिल्ह्यातील चिउलुआन येथून उपग्रह ट्रान्समीटर टॅगिंग करून सोडले होते. त्यावरुनच त्याचे नामकरण केलेल्या चिउलुआन करण्यात आले.

करु शकतो सहा हजार कीमी प्रवासअमुर फाल्कन प्रजाती आशिया, आफ्रिका खंडातील जवळपास २१ देशांमधून साधारणतः २२ हजार किलोमीटरचा प्रवास करतो.  न थांबता ६ हजार किमीचा प्रवास करू शकतो. उन्हाळ्यात आग्नेय रशिया, दक्षिण-पूर्व सायबेरिया आणि ईशान्य चीनमध्ये हा पक्षी प्रजनन करतो. त्यानंतर भारतात येतो.- आर. सुरेश कुमार, वरिष्ठ संशोधक, डब्ल्यूआयआय

- भारतातील उत्तर-पूर्वमधील आसाम, नागालँड, मणिपूर हे या पक्ष्याचे हॉटस्पॉट आहेत. प्रवासात हा पक्षी सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान भारतात असतो.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbirds sanctuaryपक्षी अभयारण्य