शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्राम सडकला उच्च न्यायालयाचा ब्रेक, मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:05 IST

जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता आचारसंहितेच्या तोंडावरच ठेकेदार न्यायालयात गेल्याने पुढील निविदा काढणेही प्रशासनाला अडचणीचे ठरले आहे. जिल्ह्यात सध्या चारशे किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होऊ घातले आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्राम सडकला उच्च न्यायालयाचा ब्रेक, मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे भोवले ठेकेदारच न्यायालयात : नव्या निविदा काढणेही थांबले

सावंतवाडी : आपल्या मर्जीतील ठेकेदारांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे वाटप केल्याचा आरोप करत ठेकेदाराच उच्च न्यायालयात गेल्याने आता जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता आचारसंहितेच्या तोंडावरच ठेकेदार न्यायालयात गेल्याने पुढील निविदा काढणेही प्रशासनाला अडचणीचे ठरले आहे. जिल्ह्यात सध्या चारशे किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होऊ घातले आहेत.संपूर्ण महाराष्ट्रात पंतप्रधान ग्रामसडक सारखीच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्याप्रमाणे राज्यात सध्या तब्बल ३० हजार किलोमीटरची कामे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून प्रस्तावित आहेत. तर काही ठिकाणी कामेही सुरू झाली आहेत. याच योजनेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५२० किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून घेण्यात आले आहेत.

यातील अडीचशे किलोमीटरची कामे सुरू झाली आहेत, तर काही कामांची निविदा काढणे सुरू आहे. तर शंभर किलोमीटरची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडकसाठी तब्बल अडीचशे कोटीचा निधीही मंजूर आहे.मात्र, दोडामार्ग येथील एका ठेकेदाराने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम भरले होते. अनेक वेळा या ठेकेदाराला मुख्यमंत्री ग्राम सडकच्या कार्यकारी अभियंत्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ठेकेदाराने कागदपत्रांची पूर्तताही केली. मात्र एक कागद पूर्ण केला की प्रशासन दुसरा कागद अपूर्ण आहे, असे सांगत ठेकेदाराला सतत कार्यालयाच्या पायऱ्या चढण्यास भाग पाडत होते.

अशातच ज्या कामासाठी संबंधित ठेकेदाराने निविदा भरली होती, त्या ठेकेदाराची निविदा न उघडता दुसऱ्याच ठेकेदाराच्या निविदा उघडण्यात आल्या. याबाबत ठेकेदाराने वेळोवेळी कार्यालयास याबाबत कळवूनही त्यांनी त्याची दाद घेतली नाही.अखेर ठेकेदाराने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कारभाराला कंटाळून थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री ग्राम सडकच्या कामातील त्रुटी लक्षात घेऊन सर्वच कामांना स्थगिती दिली आहे.

आता यावर सुनावणी २२ फेबु्रवारीला ठेवण्यात आली आहे. ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार संबंधित कार्यालय आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देण्यासाठी बाहेरील ठेकेदारांच्या कागदपत्रात त्रुटी दाखवत आहे. आमच्याकडे पूर्ण कागदपत्रे असतानाही त्रुटी का? असा सवाल करत आम्ही म्हणूनच उच्च न्यायालयात जाऊन दाद मागितली आहे. नक्कीच आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास ठेकेदाराने व्यक्त केला आहे.याबाबत कुडाळ येथील मुख्यमंत्री ग्राम सडकच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानेच आमच्या पुढील निविदा काढण्याचे काम थांबले आहे.

जिल्ह्यात तब्बल ४२० किलोमीटरच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तसेच आणखी शंभर किलोमीटरची कामे प्रस्तावित असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तसेच आचारसंहिता काही दिवसांवर आली असल्याने आता निविदा काढणेही कठीण होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsindhudurgसिंधुदुर्ग