शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कुडाळमध्ये, शासन आपल्या दारीसाठी प्रशासन सज्ज 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 5, 2023 19:06 IST

वाहन तळाची अशी राहणार व्यवस्था

सिंधुदुर्ग : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. लाभार्थ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी ११ वाजता कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर होत आहे.या कार्यक्रमासाठी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, बांधकाम तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार, आमदार, कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध गावातून लाभार्थ्यांना आणण्यासाठी एस.टी. बसेसची सुविधा करण्यात आली आहे. या बसेसमध्ये लाभार्थ्यांसाठी पाणी, नाश्ता, प्रथोमोपचार सुविधा करण्यात आली आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी देखील पाणी, ओआरएस आणि जेवणाची सोय जागेवरच करण्यात आली आहे. त्याचबरोबरच लाभार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी आरोग्य शिबीराची सोय करण्यात आली आहे.वाहन तळाची अशी राहणार व्यवस्थाउद्या कुडाळ येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना घेवून येणाऱ्या मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील एस.टी. वाहनांसाठी कुडाळ येथील क्रीडा संकुल मैदानात वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. देवगड, कणकवली, वैभववाडी,कुडाळ तालुक्यातून येणाऱ्या एस.टी. वाहनांसाठी एस.टी.डेपो येथे तसेच खासगी वाहनांसाठी क्रीडा संकुल शेजारील हॉली बॉल मैदान आणि गवळदेव शेजारील खासगी मैदानात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून येणाऱ्या एस.टी. तसेच खासगी वाहने यांनी याच ठिकाणी आपली वाहने लावून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.३३५ जणांना रोजगाराची संधीकौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून ३३५ जणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मछिंद्र सुकटे यांनी कार्यक्रम स्थळी व वाहतळाच्या ठिकाणी भेट देवून पूर्वतयारीची पाहणी केली.मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढीलप्रमाणे उद्या, मंगळवारी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने जयप्रकाश चौक, सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता  सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- जयप्रकाश चौक, सावंतवाडी. सकाळी 11.30 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- कुडाळ हायस्कुल कुडाळ. दुपारी 2 वाजता कुडाळ हायस्कुल येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता मंत्री उदय सामंत, यांच्या निवासस्थानी, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. सायं. 4 वाजता चिपी विमानतळ सिंधुदुर्ग येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गEknath Shindeएकनाथ शिंदे