शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात केमोथेरपी केंद्र लवकरच सुरू : आरोग्य मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 16:20 IST

राज्य सरकारकडून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच केमोथेरपी केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी दिली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांच्या आग्रही मागणीनंतर आरोग्यमंत्र्यांकडून सिंधुदुर्गात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात केमोथेरपी केंद्र लवकरच सुरू : आरोग्य मंत्रीआमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या मागणीवर ग्वाही

सिंधुदुर्ग : राज्य सरकारकडून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच केमोथेरपी केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी दिली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांच्या आग्रही मागणीनंतर आरोग्यमंत्र्यांकडून सिंधुदुर्गात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली.राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या दहा जिल्ह्यांमध्ये कोकणातील एकाही जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही, याकडे आमदार अ‍ॅड. डावखरे यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र नसल्यामुळे कर्करोग रुग्णांना केमोथेरपीच्या उपचारासाठी मुंबईला जावे लागते. मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांबरोबरच नातेवाईकांचेही अतोनात हाल होतात. त्यात त्यांचा बराच वेळ व पैसाही नाहक खर्च होतो.ठाणे व पालघर जिल्ह्यातील रुग्ण साधारणतः चार तासांत मुंबईला पोचू शकतात. मात्र, कोकणातील रुग्णांना किमान सहा ते 13 तासांचा प्रवास करावा लागतो.

त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात कोकणातील एका जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आमदार डावखरे यांनी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली होती. त्यावर लवकरच सिंधुदुर्गात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याची ग्वाही आरोग्य मंत्र्यांनी दिली. 

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग