शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पीएम किसान सन्मान योजनेत सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची फसवणूक, शिवसेना ठाकरे गट आंदोलन करणार

By सुधीर राणे | Updated: July 12, 2023 16:32 IST

कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांची लूट करण्याचे धोरण

कणकवली:  प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या योजनेत जिल्ह्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली होती.  मात्र, आता या योजनेत कमीत कमी लोकांना ठेवण्याचे धोरण सरकारचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३८ हजार ६५५ शेतकरी अपात्र ठरले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचीही दुटप्पी भूमिका आहे. त्यामुळे त्याविरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिला. कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले, मोदी @९ या अभियानांतर्गत भाजपाचे कार्यकर्ते जनतेमध्ये जात आहेत. त्यावेळी ज्या पद्धतीने पीएम किसान सन्मान योजनेचा गाजावाजा केला जातो, तशी सत्य परिस्थिती नाही. यामध्ये जनतेची कशी फसवणूक झाली आहे, हे देखील लोकांना आता सांगण्याची आवश्यकता आहे. या योजनेतील जिल्ह्यातील ३८ हजार ६५५ शेतकरी अपात्र ठरले आहेत, त्यांच्या  बँक खात्यातून थेट वसुली केली जात आहे. पॉवर ट्रीलर किंवा कर्ज घेताना पॅनकार्ड, आधारकार्ड द्यावे लागते. त्या कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांची लूट करण्याचे धोरण सुरू असल्याचा आरोप आमदार नाईक यांनी केला.या योजनेबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी  दुटप्पी भूमिका घेत आहेत. काही दिवसांपूर्वी  परराज्यातील बोगस लाभार्थी मिळाले असताना त्यांचा अहवाल परजिल्ह्यातील लाभार्थी असा करत अजूनही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. याबाबत आपण विधानसभा अधिवेशनात आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करत आवाज उठविणार आहोत.

एसटीचे दीड कोटी रुपये थकीत!'शासन आपल्या दारी' या उपक्रमाच्या शुभारंभासाठी आयोजित कार्यक्रमासाठी लोकांना आणण्यासाठी जिल्ह्यातील आणि बाहेरील जिल्ह्यातील एसटी बस मागविण्यात आल्या होत्या. शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात आला. लोकांना जबरदस्ती कार्यक्रमस्थळी  नेण्यात आले. एसटी महामंडळाचे दीड कोटी रुपये अजूनही जमा केले नाहीत. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने तातडीने एसटी महामंडळाची  देय रक्कम द्यावी. अशी मागणीही आमदार  वैभव नाईक यांनी यावेळी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाShiv Senaशिवसेना