शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वळीवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेपुढे गड राखण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 22:15 IST

शिरगाव : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे होम पिच असलेल्या देवगड तालुक्यातील वळीवंडे गावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे.

शिरगाव : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे होम पिच असलेल्या देवगड तालुक्यातील वळीवंडे गावच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या सत्तास्थानी असलेली शिवसेना आपला गड कायम राखणार की सत्तांतर होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.वळीवंडे गावच्या ग्रामपंचायतीत तीन प्रभागांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या सात जागा आहेत. सरपंचपद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून, सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. सदस्यपदाच्या सात जागांपैकी प्रभाग दोनमधील अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर आर. पी. आय. च्या वैशाली वळंजू या बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे, यासाठी अठरा उमेदवार रिंगणात आहेत.प्रभाग एक मध्ये पोखरबांव या भागाचा समावेश असून प्रभागातील दोन जागांपैकी एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षित आहे. या जागेवर शिवसेनेचे मिलिंद मोंडकर, समर्थ विकास पॅनेलचे महिंद्र तेली तर भाजपाचे सुहास मिठबांवकर रिंगणात आहेत. तर दुसरी जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. या जागेवर भाजपाच्या संचिता सावंत, समर्थ विकास पॅनेलच्या सायली देसाई तर शिवसेनेच्या तेजस्विनी सावंत यांनी उमेदवारी दाखल केली आहे.प्रभाग दोनमधील अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर आरपीआयच्या वैशाली वळंजू यांचा एकमात्र उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने व तो वैध ठरल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. याच प्रभागात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागेवर समर्थ विकास पॅनेलच्या समिता तेली व भाजपच्या सविता तेली यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. या प्रभागात बौद्धवाडी, कदमवाडी, मुस्लिमवाडी, तेलीवाडी आणि देसाईवाडी या भागांचा समावेश आहे.प्रभाग तीनमध्ये सदस्यांच्या तीन जागा असून, या प्रभागात सावंतवाडी, घाडीवाडी, सुतारवाडी, डोबवाडी, टेमवाडी, इळकारवाडी या भागांचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी असलेल्या दोन जागांसाठी शिवसेनेने गजेंद्र सावंत, राजेश घाडी, समर्थ विकास पॅनेलचे प्रवीण सावंत, जितेंद्र सावंत तर भाजपाने माजी सरपंच प्रकाश सावंत व सुरेश मिठबावकर यांना उमेदवारी दिली आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागेवर समर्थ विकास पॅनेलच्या सायली देसाई, भाजपाच्या समिक्षा घाडी व शिवसेनेच्या कल्पना सावंत यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.वळीवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत यापूर्वी शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर अशी लढत होत असे. ९ सप्टेंबर २०१७ रोजी शिवसेना व काँग्रेसमधील ८४ कार्यकर्त्यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाने पहिल्यांदाच उमेदवार रिंगणात उभे केल्याने निवडणूक तिरंगी होणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.विजयाकडे सर्वांचेच लक्षराज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे वळीवंडे हे होम पिच आहे. शिवसेना सोडून भाजपामध्ये गेलेले कार्यकर्ते, भाजपाने निवडणुकीत पहिल्यांदाच उभे केलेले उमेदवार, कोणत्याही पक्षांची एकमेकांशी नसलेली युती किंवा आघाडी यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने प्रतिष्ठेची केलेली आहे. निवडणूक असून सध्या सत्ताधारी असलेली शिवसेना विजयाची घोडदौड कायम राखणार का? भाजपा पहिल्याच संधीत खाते खोलणार काय? समर्थ विकास पॅनेल जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढणार काय? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.वळीवंडे गावचे सरपंचपद उपसरपंच तसेच देवगड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य सदानंद देसाई यांच्या पत्नी प्रभाग एक व तीन मधून निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेच्या माजी सभापती रेश्मा सावंत यांच्याही नेतृत्वाचा कस लागणार आहे.सरपंचपदासाठीही तिरंगी लढतसरपंचपदासाठी समर्थ विकास पॅनेलने शरयू सावंत, शिवसेनेने अर्चना घाडी तर भाजपाने पूजा घाडी यांना उमेदवारी दिली असून भाजपाने संचिता सावंत यांचा सरपंच पदासाठी डमी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाने एकमेकांशी युती अथवा आघाडी केलेली नसल्याने चुरशीच्या लढती होणार आहेत.