शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमानी परतीच्या प्रवासाला : सर्वसामान्य प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 15:43 IST

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे रेल्वेच्या नियमित गाड्यांसह जादा गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.

ठळक मुद्देचाकरमानी परतीच्या प्रवासाला : सर्वसामान्य प्रवाशांचे हालकोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना प्रचंड गर्दी

कणकवली : गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे रेल्वेच्या नियमित गाड्यांसह जादा गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. त्यातून लाखोंच्या संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गात आले होते. आता हे चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यामुळे सर्व रेल्वे गाड्या प्रवाशांनी फुल्ल होत आहेत.

दिवा पॅसेंजर, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, तूतारी, कोकण कन्या एक्सप्रेस व मंगलोर एक्सप्रेस या नियमित रेल्वे गाड्याही प्रवाशांनी फुल्ल होत आहेत. तसेच जादा गाड्यगही फुल्ल होत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागत आहे.पुढील काही दिवस गर्दीचेच!सिंधुदुर्गातच सर्व गाड्या फुल्ल झाल्याने रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना या गाड्यांमध्ये चढताच येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी त्रस्त प्रवाशांकडून होत आहे. मंगळवारी तसेच बुधवारीही सर्व रेल्वे गाड्यांना गर्दी होती. पुढील काही दिवस अशीच गर्दी रेल्वेला असण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८sindhudurgसिंधुदुर्गKonkan Railwayकोकण रेल्वे