शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

दाखले झाले आॅनलाईन; समस्या अद्याप कायम

By admin | Updated: November 5, 2014 23:38 IST

लांजा तालुका : राज्यात नंबर वन आलेल्या तालुक्यात फेरफारीसाठी अडचण

लांजा : तालुक्यातील अनेक गावात साधी मोबाईलची रेंज नाही, त्या गावातील शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा व फेरफार उपलब्ध होताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.जनतेला आॅनलाईन संगणकीय सातबारा व फेरफार मिळावेत, यासाठी इथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि संपूर्ण डाटा संगणकात आणण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक गावातील सातबारा, फेरफार आठ ‘अ’ ही कागदपत्र तलाठ्यांकडे संगणकावर मिळण्याची सोय १ नोव्हेंबरपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी तलाठी हाती माहिती भरुन देत होते. परंतु आता प्रत्येक सातबारा गटनंबर टाकून लागलीच मिळण्याची सोय प्रशासनाने केली आहे. त्यामुळेच राज्यात लांजा तालुका प्रथम आला आहे. दाखले आॅनलाईन देण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावर सर्व तलाठ्यांना लॅपटॉप घ्यायला लावले. प्रशासनाकडून मोडॅम ही सुविधा देण्यात आली. तलाठी कार्यालयात प्रिंटरही बसविण्यात आले. या सर्व सुविधा देण्यात आल्या. परंतु आॅनलाईन दाखले देण्यासाठी इंटरनेटच नाही तर दाखले देणार कसे? असा प्रश्न तलाठी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहे. काही तलाठी कार्यालयाना स्वत:ची जागा नसल्याने भाड्याच्या खोलीत आहेत. काही कार्यालयांमध्ये लाईटची सुविधा नाही, अशी अवस्था ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयांची आहे. हे सर्व मॅनेजही होईल. पण, ज्या गावात मोबाईलची संधी रेंज नाही. त्या गावात सातबारा द्यायचे कसे, असा प्रश्न तलाठ्यांना भेडसावत आहे.कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता सर्व सातबारा, फेरफार, आठ अ संगणकीकृत करण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून तलाठी हाती लिखाणाचे दाखले देणे बंद करणार आहेत. मग इंटरनेटअभावी तलाठी गावातील शेतकऱ्यांना दाखले देणार कसे आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला आपले दाखले काढण्यासाठी पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी खेटे मारावे लागणार आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ व आर्थिक भुर्दंड वाढणार आहे. राज्यात नंबर वन आलेल्या तालुक्यात मोबाईल रेंज तसेच इंटरनेटही नसल्याने शेतकऱ्यांसमोर समस्या उभी राहिली आहे. सातबारा आॅनलाईन करण्यात तालुका राज्यात प्रथम आल्याने तालुक्याची मान उंचावली आहे. मात्र, सर्व पायाभूत सुविधा आहेत का? याचा विचार करुनच त्यानंतर अंमलबजावणी करणे गरजेचे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक गावातील सातबारा, फेरफार आठ ‘अ’ ही कागदपत्र तलाठ्यांकडे संगणकावर १ नोव्हेंबरपासून देण्यास दिमाखात प्रारंभ.आता प्रत्येक सातबारा गटनंबर टाकल्यावर दाखला मिळणे शक्य.आॅनलाईन दाखले देण्यासाठी इंटरनेट नसल्याने गैरसोय.