शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेचा ३३ वा स्थापना दिन साजरा, उपमहाव्यवस्थापक गिरीश करंदीकर यांचा विशेष गौरव

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 17, 2023 17:06 IST

Konkan Railway News: कोकण रेल्वे महामंडळाच्या वतीने ३३ वा स्थापना दिवस वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात साजरा करण्यात आला. स्थापना दिवसासह राष्ट्राला समर्पित असलेल्या अविरत सेवेची २५ वर्षे देखील कोकण रेल्वेने पूर्ण करून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.

- महेश सरनाईक सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे महामंडळाच्या वतीने ३३ वा स्थापना दिवस वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात साजरा करण्यात आला. स्थापना दिवसासह राष्ट्राला समर्पित असलेल्या अविरत सेवेची २५ वर्षे देखील कोकण रेल्वेने पूर्ण करून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने कोकण रेल्वे व्यवस्थापनाच्या २५ वर्षांच्या अखंडीत सेवापूर्ती निमित्त महामंडळातील अधिकारी- कर्मचारी यांचा विशेष सत्कार कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग (फायनान्स), संतोष कुमार झा (ऑपरेशन्स, कमर्शिअल ), आर. के.हेगडे (वे-वर्कस्) व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कोकण रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) गिरीश करंदीकर, कार्यकारी संचालक (प्रकल्प) एल. प्रकाश, डेप्युटी लेखा अधिकारी अरूप बागुई यांच्यासह विविधविभागात उल्लेखनीय काम केलेल्या विभागांना तसेच वैयक्तिक कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात उल्लेखनीय कामासाठी कोकण रेल्वे जनसंपर्क विभागाला देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर सोहळ्यास कोकण रेल्वेच्या सर्व विभागातील विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

गिरीश करंदीकर विशेष पुरस्काराने सन्मानितकोकण रेल्वेच्या ३३ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत कोकण रेल्वेच्या स्थापने पासून रेल्वेसाठी मोठ योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाचे उपमहाप्रबंधक गिरीश करंदीकर यांना यावेळी कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते आणि अन्य संचालकांच्या उपस्थितीत विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग