शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काजू बागायतदारांनीच फलक लावला, दीपक केसरकर यांचे आरोप चुकीचे - विलास सावंत

By अनंत खं.जाधव | Updated: May 4, 2024 19:49 IST

सावंतवाडी : काजू बी ला हमीभाव मिळत नसल्यानेच काजू बागायतदार शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन प्रचार करावा अशा प्रकारचे ...

सावंतवाडी : काजू बी ला हमीभाव मिळत नसल्यानेच काजू बागायतदार शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन प्रचार करावा अशा प्रकारचे फलक लावले आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गैरसमज करून देत आहेत. ते म्हणाले त्या प्रमाणे उध्दव शिवसेने कडून हे फलक लावले नसून शेतकऱ्यांमधून हे फलक लावण्यात आले असा खुलासा सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे.काजूच्या हमीभावावरून लावण्यात आलेल्या फलकामुळे राजकीय मंडळी संभ्रमित झाली आहेत. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना इशारा देण्यात आला आहे. हा नुसता ट्रेलर आहे. शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली ती पाळली गेली नाहीत तर विधानसभेला संपूर्ण सिनेमा दाखविला जाईल असेही या पत्रकात म्हटले आहे.दीपक केसरकर यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत जे विधान केलं आहे ती शेतकऱ्यांची व कारखानदारांची बैठक लावली त्यामध्ये कमीत कमी १२० रुपये दर ठरला, हे जरी सत्य असलं तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठच्याही कारखानदाराने दीपक केसरकर सांगितल्याप्रमाणे काजू खरेदी केली नाही. उलट काजू बी बघायला नेऊन त्यामध्ये त्रुटी काढून ह्या काजू ११०-११२ रुपये प्रति किलो प्रमाणे देण्याची कारखानदारांनी मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागातदार संघाने स्वतःच्या हिंमतीवर जिल्ह्याबाहेरील पुणे,,नासिक, आजरा, चंदगड, गोवा येथील कारखानदारांना सुमारे २३०  टनाच्या आसपास काजू १२० रुपये प्रति किलो तर काही काजू बी १२५ ते १२८ दराने विकली गेली आहे.  जिल्ह्यातील कारखानदारांना दीपक केसरकर यांनी दिलेला शब्द पाळला नाही, ही खरी शोकांतिका आहे. खरंतर शेतकरी संघटनेकडून जो फलक लावण्यात आला त्या सभासदांचे खरोखर कौतुक केले पाहिजे असेही सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर