शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेर्लेत साकव गेला वाहून, पहिल्याच पावसात वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:33 IST

पावसाने जोरदार हजेरी लावत बांदा परिसरातील गावांना चांगलेच झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे श्रमदानाने बांधण्यात आलेला साकव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बांद्यात ये-जा करण्यासाठी आता शेर्ले पंचक्रोशीतील नागरिकांना होडीचा आधार घ्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देशेर्लेत साकव गेला वाहून, पहिल्याच पावसात वाहतूक बंद ग्रामस्थांना घ्यावा लागणार होडीचा आधार

बांदा : पावसाने जोरदार हजेरी लावत बांदा परिसरातील गावांना चांगलेच झोडपून काढले आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढत आहे. नदी, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तेरेखोल नदीपात्रात शेर्ले येथे श्रमदानाने बांधण्यात आलेला साकव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बांद्यात ये-जा करण्यासाठी आता शेर्ले पंचक्रोशीतील नागरिकांना होडीचा आधार घ्यावा लागणार आहे.याठिकाणी नदीपात्रात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. शेर्ले दशक्रोशीतून बांद्यात येण्यासाठी नदीपात्रात दरवर्षी ग्रामस्थ श्रमदानाने साकवाची उभारणी करतात. डिसेंबरमध्ये साकव उभारण्यात येतो.शेर्ले दशक्रोशीतील ग्रामस्थांना बांदा शहरात येण्यासाठी इन्सुली आरटीओ नाका येथून ३ किलोमीटर लांबीचा फेरा मारून यावे लागते. शहरात येण्यासाठी नदीपात्रातून हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे याठिकाणी गेली कित्येक वर्षे पुलाची मागणी होत होती. पावसाळा संपल्यावर ग्रामस्थ याठिकाणी श्रमदानाने साकव उभारून वाहतुकीची व्यवस्था करतात. पावसाळ्यात शेर्ले तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ होडीतून प्रवास करतात.

पहिल्याच पावसात तेरेखोल नदीचे पात्र प्रवाहित झाल्याने साकव वाहून गेला. येथून जाणाऱ्या पाईपलाईनचे काम यावर्षी सुरू करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे काम बंद ठेवण्यात आले होते. याठिकाणी पूल उभारल्यास दशक्रोशीतील वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे.सदर पुलावरुन शेर्ले, मडुरा, कास, निगुडे, रोणापाल, सातोसे पंचक्रोशीतील लोकांना बांदा शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून उपयोग होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यानंतर पुलाचे काम सुरू करणे आवश्यक आहे. अन्यथा येथील ग्रामस्थांना आणखीन वर्षभर तरी पुलाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.पुढच्यावर्षी जीवघेण्या प्रवासातून मुक्तता ?येथे होणाऱ्या पुलामुळे ग्रामस्थांना होडीच्या जीवघेण्या प्रवासातून मुक्तता मिळणार आहे. यावर्षी पावसाळ्यात चार महिने ग्रामस्थांना होडीचा प्रवास करावा लागणार आहे. पण पुढच्या वर्षी पाईपलाईनचे काम वेळेवर सुरू झाल्यास जीवघेण्या होडी प्रवासातून मुक्तता मिळणार आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग