शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

Sindhudurg: तिलारी कालव्यात कार कोसळली, महिलेचा मृत्यू; मुलासोबत लक्ष्मीपूजनासाठी घरी परतताना काळाचा घाला

By सुधीर राणे | Updated: December 19, 2024 12:48 IST

वैभव साळकर दोडामार्ग : कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीसोबत आपल्या लहान मुलाला ठेवून गुरुवारी लक्ष्मीपूजन करण्यासाठी ...

वैभव साळकरदोडामार्ग : कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीसोबत आपल्या लहान मुलाला ठेवून गुरुवारी लक्ष्मीपूजन करण्यासाठी घरी परतणाऱ्या पत्नीवर बुधवारी मध्यरात्री काळाने घाला घातला. मोठ्या मुलासोबत कारने येत असताना कारवरील नियंत्रण सुटून ती तिलारी कालव्यात कोसळून अपघात झाला. अपघातात शुभांगी शिवा परब (वय ५५) यांचा मृत्यू झाला. तर सचिन शिवा परब (रा. ओझरी, ता. पेडणे, गोवा) जखमी झाला. साटेली भेडशी भोमवाडी येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली.शुभांगी परब यांचे पती शिवा परब हे गोवा येथील शिक्षण विभागात कार्यरत होते. अलीकडेच ते सेवानिवृत्त झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल केले होते. तर त्यांचा मोठा मुलगा सचिन परब हा गोव्यातील पोलीस खात्यात कार्यरत आहे. वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करावी व मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असल्याने लक्ष्मीपूजन करण्यासाठी आईला घरी आणावे यासाठी सचिन हा आपल्या लहान भावाला घेऊन कारने बुधवारी कोल्हापूरला गेला. त्यानंतर सायंकाळी शुभांगी यांनी आपल्या लहान मुलाला पतीसोबत ठेवून मोठ्या मुलासह घरी येण्यास निघाल्या. मात्र सायंकाळची वेळ असल्याने त्यांनी रात्री कुडासे वानोशी येथे आपल्या माहेरी मुक्काम करण्याचे ठरविले. त्या दिशेने जात असता साटेली- भेडशी येथील भोमवाडी मुख्य रस्त्यावरील कालव्याजवळ त्यांची गाडी आली असता सचिनचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट कालव्यात कोसळली. 

स्वत:सह आईलाही कारमधून बाहेर काढले, पण..कालव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने गाडी वाहून जाऊ लागली. सचिन धिटाईने गाडीतून बाहेर पडला व आईलाही गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर लगतच्या घरातील लोकांना मदतीसाठी बोलविले. सचिनने स्थानिकांच्या मदतीने आईला तत्काळ लगतच्या साटेली -भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र शुभांगी परब यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद केलाअपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. शिवाय सर्व हकीकत सांगून तिलारी कालव्यातील पाणी बंद करण्याची विनंती केली. अधिकाऱ्यांनी देखील वेळ न दवडता कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद केला. मात्र अपघातामुळे गाडी तब्बल ५० मीटर अंतरापर्यंत वाहून गेली होती. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांचे जाबजबाब नोंदवून पंचनामा केला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातDeathमृत्यू