शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

करुळ घाटातील दरीत कार कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 05:42 IST

करुळ घाटाच्या मध्यावर पाचशे फुट खोल दरीत कार कोसळली.

वैभववाडी : करुळ घाटाच्या मध्यावर पाचशे फुट खोल दरीत कार कोसळली. या अपघातातून कारमालक स्वप्नील रामचंद्र भाट(३२, रा. मुलुंड, मुंबई) हे सुदैवाने बचावले आहेत. त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला.मुलुंड येथील स्वप्नील भाट हे आपली कार (क्रमांक एम.एच.०३,बीपी-८९२४) घेऊन कोल्हापुरहून गगनबावडामार्गे कणकवली येथे निघाले होते. करुळ घाट उतरत असताना एका धोकादायक वळणावर त्याचे नियंत्रण सुटल्यामुळे कारसह ते दरीत कोसळले. कोसळलेली कार पाचशे फुट खोल दरीत जाऊन स्थिरावली. या कारच्या मागोमाग असलेल्या ट्रक चालकाच्या समोरच हा अपघात घडल्यामुळे ट्रकचालक अणि क्लिनर या दोघेही कशाचाही विचार न करता ते दरीत उतरले. तोपर्यंत कारमालक भाट हे गाडीतून कसेबसे बाहेर निघत होते.कारची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भाट यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली. ट्रकचालक आणि क्लिनरने कारमालक भाट यांना दरीतून बाहेर आणले. तेथून त्यांना गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान घाटात कार कोसळल्याची माहीती मिळताच वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दरीतील अपघातग्रस्त कारमध्ये आणखी कोणी आहे का? याचा दरीत उतरुन शोध घेतला. मात्र कुणीही आढळून आले नाही. जखमी कार मालक भाट यांच्यावर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन अधिक उपचारासाठी कोल्हापुरला हलविण्यात आले.>संरक्षक कठडाच नसल्याने कार गेली दरीतघाटाच्या मध्यावरील धोकादायक वळणावरुन कार दरीत कोसळली. त्याठिकाणी संरक्षक कठडा किवा क्रॅश बॅरियर्स अस्तित्वात नाही. अन्यथा त्याला धडकून कार थांबली असती. धोकादायक वळणावर कठडा किंवा क्रॅश बॅरिअर्सची आवश्यकता असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल उपस्थितांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

टॅग्स :vaibhavwadiवैभववाडी