शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करा! उदय सामंतांचं शिवसैनिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 17:27 IST

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मी रत्नागिरी जिल्ह्याचा असूनही या जिल्ह्याने मला स्वीकारून योग्य तो मान सन्मान दिला आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील जनतेचा व शिवसैनिकांचा मी ऋणी आहे.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतींसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता मिळवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी करून त्या काबीज कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. याच बरोबर, महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचा  कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.    

यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, कामगार नेते आप्पा पराडकर, गीतेश कडू,राजू शेट्ये,महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत  नाईक, कन्हैया पारकर, राजू राठोड, संदेश सावंत- पटेल,संजना कोलते, माधवी दळवी, दिव्या साळगावकर, सुदाम तेली, प्रसाद अंधारी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मी रत्नागिरी जिल्ह्याचा असूनही या जिल्ह्याने मला स्वीकारून योग्य तो मान सन्मान दिला आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील जनतेचा व शिवसैनिकांचा मी ऋणी आहे. जनतेने टाकलेला विश्वासाला तडा जावू देणार नाही. आमदार दीपक केसरकर यांनी सुरू केलेली चांदा ते बांदा ही योजना बंद पडली आहे. ही योजना सिंधूरत्न या नावाने सुरू करण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपण करणार आहे.तसेच  ही योजना चांदा ते बांदा अशीच राबवावी अशीही मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.           ते म्हणाले, जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो ? हे जनतेला माहीत आहे, जनताच विरोधकांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा सोहळा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडत आहेत. दोन वर्षांच्या कालखंडात जिल्ह्याच्या विकासाठी कोट्यवधीचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. चार नगरपंचायतीच्या व जिल्हा बँक निवडणुकीमध्ये शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीचा विजय होणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. कामगार नेते आप्पा पराडकर यांनी उदय सामंत यांना स्वामी समर्थांची प्रतिमा व तलवार भेट देत सत्कार केला. संदेश पारकर व इतर पदाधिकाऱ्यांनीही यावेळी सत्कार केला. फोटो ओळ - कणकवली येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर आयोजित सत्कार समारंभाच्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना