शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मकर संक्रांत सणावर महागाईचे सावट, सुगड, तीळगूळ महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:33 IST

मकर संक्रांत अवघ्या एका दिवसावर आल्याने वेगवेगळ्या आकारांची मातीची सुगडे ग्रामीण भागासह कणकवली बाजारात दाखल झाली आहेत. संक्रांतीच्या तयारीसाठी बाजार फुलून गेला आहे. सर्वसामान्यांचा आवडता सण असलेल्या संक्रांतीच्या सणावर यंदा महागाईचे सावट पसरले आहे.

ठळक मुद्दे मकर संक्रांत सणावर महागाईचे सावट, सुगड, तीळगूळ महागले बाजारात खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग

कणकवली : मकर संक्रांत अवघ्या एका दिवसावर आल्याने वेगवेगळ्या आकारांची मातीची सुगडे ग्रामीण भागासह कणकवली बाजारात दाखल झाली आहेत. संक्रांतीच्या तयारीसाठी बाजार फुलून गेला आहे. सर्वसामान्यांचा आवडता सण असलेल्या संक्रांतीच्या सणावर यंदा महागाईचे सावट पसरले आहे.सर्व महिला आपल्या सौभाग्याचे रक्षण व्हावे आणि मनातील दुरावा दूर करण्यासाठी संक्रांतीला एकमेकांना हळदी कुंकवाचे वाण देतात. मात्र महिलांच्या या वाणांवरही महागाईचे सावट पसरले आहे.संक्रांतीसाठी सुगड आवश्यक असतात. मात्र, ही सुगड पुजण्याची प्रथा परंपरेनुसार आजही कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याच श्रद्धेने सुरू आहे. परंतु नेहमीच्या महागाईमध्ये सुगडेही महाग झाली आहेत. लहान आकाराची सुगड ३० ते ४० रुपयांना एक तर मोठ्या आकाराची सुगड ५० ते ६० रुपयांना एक नग या भावाने कणकवली बाजारपेठांमध्ये विकायला आली आहेत.दिवसेंदिवस महाग होत चाललेली माती, सुगड बनविण्याची मजुरी, साहित्य, वेळ आदींचा परिणाम यावर्षी सुगडांच्या किमतीवर झालेला दिसत आहे. संक्रांतीचे सगळ्यात मोठे आकर्षण असले तरी महिलांचे मात्र सुगडाचे वाण देण्याची प्रथाही आपल्याकडे आहे. तीळगूळ, बोर, गाजर, शेंगदाणे, हुरडा, एखादे फळ, आणि ऊस सुगडात ठेवून ते महिला एकमेकींना देतात. त्यामुळे बाजारात सध्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू आहे. 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीsindhudurgसिंधुदुर्ग