शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यातील दुरुस्तीची कामे पूर्ण, तिलारीचे पाणी 5 एप्रिलपर्यंत ओटवणेत; गोव्याकडूनही परवानगी

By अनंत खं.जाधव | Updated: March 30, 2023 15:34 IST

सद्यस्थितीत डाव्या कालव्यात २० किलोमीटर अंतरापर्यंत पाणी पोहोचले

सावंतवाडी : तिलारीच्या बांदा शाखा कालव्यातील दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करण्यात झाली आहेत. त्यामुळे आता 5 एप्रिल पर्यंत पाणी ओटवणे रोणापाल, निगुडे गावापर्यंत पोहोचणार आहे. याचा फायदा सर्व गावांना होणार आहे. याबाबतची माहिती तिलारी विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.तिलारीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोवा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये गुरूवार पासून २.० घमी प्रतिसेकंद वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचं विलवडे, सरमळे, इन्सुली, ओटवणे, नेतर्डे, डोंगरपाल, बांदा, वाफोली या सर्व गावांना याचा फायदा होणार असल्याचे कोरे यांनी सांगितले.उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने व कालव्यात अद्यापपर्यंत पाणी पोहोचले नसल्याने इन्सुली सह ओटवणे निगुडे रोणापाल येथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी कालव्यात बसून जलआंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर कालव्यातील कामे युद्धापातळीवर पूर्ण करण्यात आली. नुकत्याच सावंतवाडीत झालेल्या आढावा बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत पाटबंधारे विभागाला निर्देश दिले होते. तसेच लोकांची मागणी लक्षात घेता विजघर येथील विद्युत प्रकल्पाचे पाणी तत्काळ थांबवा आणि शेतकऱ्यांना तात्काळ पाणी सोडा, अशा सूचना केल्या होत्या. अभियंता कोरे यांनी याची तातडीने दखल घेत पाणी सोडले असून सद्यस्थितीत डाव्या कालव्यात २० किलोमीटर अंतरापर्यंत पाणी पोहोचले आहे. कालव्यातील सर्व अडथळे दूर करण्यात आले असून २६ मार्च पासून पाण्याचा विसर्ग १.० घमी प्रतिसेकंद वरून २.० घमी प्रतिसेकंद करण्यात आला आहे. आजपासून विसर्गामध्ये अजून वाढ़ करण्यात येणार आहे. यासंदर्भात गोव्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा देखील करण्यात आली आहे. पाण्याचा विसर्गाचा वेग वाढविण्यात आल्यानंतर ५ एप्रिल पर्यंत ४२ किलोमीटर लांबीच्या कालव्यात पाणी पोहोचणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाTilari damतिलारि धरण