शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

..पण केसरकरांना उमेदवारी नको, भाजप नेते राजन तेलींची मागणी 

By अनंत खं.जाधव | Updated: July 8, 2024 17:46 IST

'निवडणुका आल्या की रोजगार आठवतो' 

सावंतवाडी : निवडणूकजवळ आल्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर इथल्या तरुणांना जर्मनीत नोकऱ्यांचे आमिष दाखवत आहेत. परंतु या आधी त्यांनी केलेल्या चष्मा कारखाना, सेटअप बॉक्स, ऍक्युझमेंट पार्क आदी घोषणांचे काय झाले त्या कुठे गेल्या ? त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणालाही आमदार करा परंतु केसरकर नको असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. केसरकर यांना शिक्षण खातेच कळाले नाही म्हणून कदाचित त्यांनी राबविलेल्या उपक्रमाची नोंद गिनीज बुकात घेण्यात आली असावी असा टोलाही तेली यांनी लगावला.तेली म्हणाले, केसरकर यांनी माझी पक्षातून हाकालपट्टी करण्याची मागणी भाजप नेत्यांकडे करणार असल्याचे वक्तव्य केले. मुळात मी कुठलीही पातळी सोडून केसरकर यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही. संच मान्यतेच्या नवीन निकषानुसार मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, डीएड बीएड धारक यांच्यावर होणाऱ्या अन्यासंदर्भात आपण बोललो हे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले होते. त्यामुळे याला शिक्षण मंत्री म्हणून केसरकरच जबाबदार असल्याचे तेली म्हणाले. आपण केसरकर यांना शिक्षण खाते कळाले नाही असे म्हणालो. यामध्ये वैयक्तिक पातळी सोडून कुठलीही टीका केलेली नाही. केसरकर यांनी पुन्हा तक्रार करावीचत्यामुळे त्यांनी खुशाल माझ्या हकालपट्टीची मागणी करावी. उलट मीच त्यांना शिक्षण खाते समजत नसल्याने मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. केसरकर यांनी ज्या ज्या वेळी माझी तक्रार पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे त्यावेळी मला पक्षात चांगल्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केसरकर यांनी पुन्हा एकदा माझी तक्रार करावीच.

..तर कोणाकडे अपेक्षा करणार?सिंधुदुर्गातील शिक्षण संस्था टिकल्या पाहिजेत ही आपली अपेक्षा आहे, येथील मुलांवर होणारा अन्याय शिक्षकांवर आलेल्या अडचणी याबाबत आपण बोललो यात गैर कुठे? तुम्ही राज्याचे शिक्षण मंत्री आहात त्यामुळे आम्ही तुमच्याकडे नाही तर कोणाकडे अपेक्षा करणार? त्यामुळे भविष्यातही आपण यावर बोलत राहणार.

बोलायला भाग पाडू नका, नाहीतर..तेली पुढे म्हणाले, युती धर्म मी सुद्धा पाळतो म्हणूनच गप्प आहे, मला उमेदवारी मिळावी असे मी कधीच म्हणालो नाही. भाजप पक्षाला येथून उमेदवारी दिली जावी अशी आपली मागणी आहे. परंतु तुमच्यासारखं मला खोटं बोलता येत नाही हीच माझी मोठी अडचण आहे. त्यामुळे मला बोलायला भाग पाडू नका, माझं तोंड उघडलं तर तुम्हाला खूपच अडचणीच होईल हे लक्षात ठेवा.

निवडणुका संपल्या की रोजगार विसरतातनिवडणुका जवळ आल्या की ते युवकांना रोजगार देतात निवडणूका संपल्या की रोजगार विसरतात. आज इथल्या तरुणांना जर्मन येथे नोकऱ्या देणार असल्याचा नवीन आमिष त्यांनी आणलं आहे. मात्र याआधी त्यांनी येथील जनतेला चष्मा कारखाना. सेटअप बॉक्स, एक्युझमेंट पार्क आदीची आश्वासने दिली त्याचे काय झाले याचे उत्तर द्यावे अशी मागणी ही तेली यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली Deepak Kesarkarदीपक केसरकर