शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीतील व्यावसायिकाने गळफास घेऊन जीवन संपविले, घरातून रक्त बाहेर आल्याने उघडकीस आली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:14 IST

घरात एकटेच राहत होते

सावंतवाडी : सावंतवाडी सालईवाडा येथील प्रसाद कोल्ड्रिंक्सचे मालक प्रसाद सुभाष पडते (४२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. त्यांच्या घरातून रक्त बाहेर येताना दिसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.पडते यांचे घर गेल्या दोन दिवसांपासून बंद होते. बुधवारी दुपारी घराच्या दरवाजातून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर येताना शेजाऱ्यांना दिसले, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तत्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील रहिवासी दत्ताराम पडते यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी प्रसाद पडते यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.दत्ताराम पडते यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली असावी, कारण मृतदेहातून रक्त बाहेर येऊन ते दरवाजाबाहेर आले होते. पडते हे घरात एकटेच राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले होते.प्रसाद पडते यांचे सावंतवाडी बाजारपेठेत ‘प्रसाद कोल्ड्रिंक्स’ नावाचे दुकान आहे आणि ते गेली अनेक वर्षे हा व्यवसाय करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते दिसून न आल्याने त्यांच्या घराजवळ चौकशी केली असता, दरवाजा बंद आढळला आणि त्यानंतर रक्ताचा वास आल्याने हा प्रकार समोर आला.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासणीसाठी तो रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, हवालदार महेश जाधव, अनिल धुरी, निलेश नाईक आणि सचिन चव्हाण यांनी घटनास्थळी पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. या घटनेने सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.