शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बौध्दजन संघातर्फे रत्नागिरीत रविवारी धम्म परिषद

By admin | Updated: November 17, 2016 22:08 IST

वि. ल. मोहिते : जागतिक स्तरावरील बौद्ध धम्मगुरूंसह बौद्ध भिक्खूगणांची उपस्थिती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महांसघातर्फे रविवार, २० रोजी धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी भारताबरोबरच थायलंड, श्रीलंका, बांगला, जपान, म्यानमार आदी देशांतून बौद्ध भिक्खूगण उपस्थित राहून धम्मदेसना देणार आहेत, अशी माहिती या महासंघाचे सभापती वि. ल. मोेहिते यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.म्यानमार या देशातील बौद्ध राजा थिबा याचे रत्नागिरीत वास्तव्य होते. त्याच्या राजवाड्याच्या रूपाने त्याच्या स्मृती आजही जतन केल्या जात आहेत. कोकणात बौद्ध संस्कृतीचे अनेक घटक पाहायला मिळतात. तसेच हा जिल्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जिल्हा आहे. त्यांच्या क्रांतीचा उगम कोकणात आहे. त्यामुळे या भूमीला विशेष महत्व आहे. त्यामुळे जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाचे तत्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गतिमान करावे, या उद्देशाने जिल्हा बौद्धजन महासंघाने रत्नागिरीत या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले असल्याचे मोहिते यांनी याप्रसंगी सांगितले.ही परिषद राज्य उत्पादन शुल्कच्या शहरातील कार्यालयाशेजारील थिबा राजाचे पूजास्थळ असलेल्या बुद्ध विहारासमोर सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार असल्याचे मोहिते यावेळी बोलताना सांगितले.दुसऱ्या सत्रात नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, डॉ. सूर्यकांत देवकेकर, प्रा. दिलीप काकडे, यशवंत जाधव, शर्मिला बारूआ या मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. ही धम्मपरिषद रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाचे सभापती वि. ल. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या धम्म परिषदेत बौद्ध समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात येणार आहेत. त्यात जिल्हा बौध्दजन महासंघाला जागतिक स्तरावर मान्यता मिळणे, राज्यघटनेच्या चौकटी राहून बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा करणे, अल्पसंख्याकांप्रमाणे सवलती मिळणे, जातीच्या दाखल्यामध्ये स्वतंत्र बौद्ध असा उल्लेख असणे तसेच बुद्धगया ही भूमी बौद्ध बांधवांच्या ताब्यात देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. तसेच ही धम्म परिषद केवळ बौद्ध बांधवांसाठी आयोजित करण्यात आली नसून, विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान असलेल्या बौद्ध धम्माची ओळख सर्वांना व्हावी, धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी प्रशिक्षित कार्यकर्ता तयार होण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी राहावी, संस्कार विधीमध्ये एकसूत्रता यावी, धम्मकार्यासाठी आदर्श भिक्खुंची यंत्रणा निर्माण व्हावी आदी अनेक उद्देश या परिषदेमागे आहेत. त्यामुळे सर्व धर्मियबांधवांनीही या परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन शेवटी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाचे सभापती वि. ल. मोहिते यांनी केले.यावेळी त्यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्हा बौध्द महासंघाचे स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)भन्ते फ्रतेपबोधीविदेस महाथेरो (थायलंड), नभोदीरत्न नायक महाथरो (थायलंड), विमलकीर्ती महाथेरो (श्रीलंका), के. मेधानकरा महाथेरो (श्रीलंका), कल्याणप्रिय महाथेरो (बांगलादेश), सत्यानंद महाथेरो (जपान), चालिंदा महाथेरो, रत्नबोधी महाथेरो, आर्यनाग अत्तदर्शी, सुमेधो महोथेरो, डॉ. हर्षबोधी महाथेरो, बोधीशील महाथरो (भारत) या धम्मगुरूंच्या धम्मदेसनाचा कार्यक्रम पहिल्या सत्रात होणार आहे.