शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

साटेलीतील बीएसएनएल सेवा विस्कळीत

By admin | Updated: January 12, 2015 21:47 IST

अशा कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जेव्हा कारवाईची वेळ येते, तेव्हा त्या कायद्यातील पळवाटा शोधल्या जातात.

गजानन बोंद्रे- साटेली भेडशी -परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. ग्राहकांकडून स्थानिक स्तरावर अनेक तक्रारी होऊनही त्यावर आजपर्यंत सुधारण्याच्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. याचा नाहक त्रास गरीब जनतेला सहन करावा लागत आहे. एका ठिकाणी ग्राहकांच्या हिताचे आणि हक्कांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने अनेक कायदे केले जातात. मात्र, याच कायद्याद्वारे ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण होत आहे किंवा नाही, याची खात्री मात्र नक्कीच देता येणार नाही. कारण अशा कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जेव्हा कारवाईची वेळ येते, तेव्हा त्या कायद्यातील पळवाटा शोधल्या जातात. यातून शेवटी ग्राहकांना मात्र न्याय न मिळता त्यांची अधिकच पिळवणूक होते. सद्य:स्थितीत साटेली भेडशी परिसरात अनेक दूरध्वनी बंद स्थितीत आहेत. बंद असलेल्या दूरध्वनी ग्राहकांनी वेळोवेळी तक्रारी देऊनही सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे कामगार ग्राहकांजवळ अजूनपर्यंत पोहोचलेले नाहीत. परिणामी ग्राहकांची दूरध्वनी सेवा बंद असून, बिले मात्र न चुकता येत आहेत. यामुळे अनेक ग्राहकांचा कंपनीबाबतचा संताप वाढत आहे. या परिसरात अनेक असे ग्राहक आहेत, जे बीएसएनएलच्या सेवांना पुरेपूर कंटाळलेले आहेत. सेवा बंद असताना बिले का भरावीत, असा प्रश्न ग्राहकांमधून विचारला जात आहे. ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतर तक्रारीचे निवारण करण्यासाठी आलेले कंपनीचे कामगार ग्राहकांना विचित्र प्रकारची उद्धट उत्तरे देतात. तसेच ग्राहकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. पूर्वीच्या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्याने या परिसरात कामगारांची उणीव भासत असून, त्यामुळे येथील ग्राहकांना या कंपनीच्या सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. तसेच विनाकारण मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कंपनीने दिलेली दूरध्वनी सेवेतील इन्स्ट्रूमेंट साध्या कंपनीची असून, ती वरचेवर खराब होतात. याची तक्रार दिली असता, कंपनीचे कामगार येऊन दुरुस्ती अथवा इन्स्ट्रूमेंट न बदलता ग्राहकांना नको ती उत्तरे देतात. दुरुस्ती होणार नाही किंवा याला अनेक महिने जातील, असे सांगून ग्राहकांनाच नवीन इन्स्ट्रूमेंट घेण्याचा सल्ला देतात. सेवा देणाऱ्या कंपनीने अशी इन्स्ट्रूमेंट योग्य वेळी बदलून देऊन किंवा दुरुस्ती करून देऊन ग्राहकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड पडणार नाही, याची जबाबदारी घेतली पाहिजे, अशी मागणी सर्व ग्राहकांमधून होत आहे. कंपनीची केबल या परिसरात अनेक ठिकाणी जमिनीवर पडलेली असून, त्यामुळेच या केबलच्या चोरीत वाढ होऊन याचा नाहक त्रास कंपनीबरोबरच ग्राहकांनाही सोसावा लागत आहे. कं पनीचे सध्याचे कामगार ग्राहकांच्या समस्यांकडे आणि तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. या सर्वांची कंपनीच्या वरिष्ठांमार्फत योग्य चौकशी होऊन ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे, त्यांना योग्य सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांना विनाकारण कोणताही आर्थिक भुर्दंड पडू नये, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी परिसरातील ग्राहकांमधून होत आहे. बीएसएनएलच्या दूरध्वनी सेवेबरोबरच भ्रमणध्वनी सेवाही फारच विस्कळीत झालेली असून, या सेवेला ग्राहक फारच कंटाळलेले आहेत. भ्रमणध्वनीवर बोलता-बोलता रेंज गायब होणे, आवाज न येणे, सेवा बंद होणे आणि बऱ्याचवेळा फोन न लागणे, अशा विचित्र प्रकारांनी या परिसरातील ग्राहक फारच हैराण झाला असून, यावर वरिष्ठांमार्फत योग्य अशी उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे. कंपनीची दूरध्वनी सेवा पूर्णपणे खराब असून, अनेक ग्राहक ही सेवा बंद करण्याच्या मार्गावर आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून, याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील काय, असे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.सेवा कायमची बंद करण्याच्याच विचारातमाझ्या घरातील आणि दुकानातील दूरध्वनी सेवा अनेक महिन्यांपासून बंद असून, वेळोवेळी तक्रार देऊनही ती सेवा आजपर्यंत सुरू झालेली नाही. अनेक महिने उलटूनही सेवा बंद असतानाही बिले मात्र दर महिन्याला येतच असून, मला हा नाहक त्रास आणि भुर्दंड पडत आहे. दूरध्वनी सेवा लवकरात लवकर सुरू न झाल्यास ती कायमची बंद करण्याचा विचार करीत आहे. - कमलाकांत मोरजकर, दुकान व्यावसायिक, भेडशी