शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चाफेखोल गावकरवाडीत लोकवर्गणीतून साकारणार पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 11:49 IST

गेली सहा वर्षे वारंवार मागणी करूनही चाफेखोल मुख्य रस्ता ते गावकरवाडी येथील ओहोळावर पूल बांधण्यासाठी शासनाकडून विकासनिधी मंजूर न झाल्यामुळे अखेर चाफेखोल - गावकरवाडी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून सुमारे २१ लाख रुपये अपेक्षित खर्चाचा पूल बांधण्याचा संकल्प केला आहे

ठळक मुद्देचाफेखोल गावकरवाडीत लोकवर्गणीतून साकारणार पूल बांधकामाचे भूमिपूजन : २१ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित

चौके/सिंधुदुर्ग  : गेली सहा वर्षे वारंवार मागणी करूनही चाफेखोल मुख्य रस्ता ते गावकरवाडी येथील ओहोळावर पूल बांधण्यासाठी शासनाकडून विकासनिधी मंजूर न झाल्यामुळे अखेर चाफेखोल - गावकरवाडी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून सुमारे २१ लाख रुपये अपेक्षित खर्चाचा पूल बांधण्याचा संकल्प केला आहे.अखिल भारतीय गाबीत समाज शाखा, मालवणचे सल्लागार आणि पडवणे, देवगडचे माजी सरपंच महेश जुवाटकर यांच्या प्रमुख सहकार्यातून आणि प्रेरणेतून गावकरवाडी ग्रामस्थांनी हा पूल बांधण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

घाडीगावकर परिवाराची दहा घरे आणि सुमारे ४० लोकवस्ती असलेल्या गावकरवाडीला जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर मध्येच ओहोळाच्या पाण्यातून जावे लागत होते. या त्रासातून सुटका व्हावी यासाठी आता गावकरवाडी ग्रामस्थांनी स्वतः पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुलाच्या कामाचे भूमिपूजन १ जानेवारी रोजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बापू घाडीगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी चाफेखोल सरपंच रिता वायंगणकर, आनंद वराडकर, दादा नाईक, शशिकांत घाडीगावकर, प्रकाश सकपाळ, बळीराम शिंदे, प्रफुल्ल पवार, रामचंद्र पवार, सूर्यकांत घाडीगावकर, माळगाव सरपंच निलेश खोत, नितीन माणगावकर, अर्जुन परब, वामन जाधव, रवींद्र गोसावी, आनंद घाडीगावकर, सचिन घाडीगावकर, रमेश घाडीगावकर, संदीप घाडीगावकर, उमेश घाडीगावकर, मंगेश घाडीगावकर, किशोर घाडीगावकर आदी उपस्थित होते.लोकवर्गणीचा आगळावेगळा आदर्शगावकरवाडी ग्रामस्थांच्या संकल्पाला मदत म्हणून अनेक हात पुढे आले आहेत. आतापर्यंत सुमारे १३ लाख रुपयांचा निधी जमा झाला. काही दानशूरांनी वाळू, खडी, स्टील तसेच सिमेंट वस्तू स्वरूपात मदत देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे लोकसहभागातून एखादे अशक्य कामही कसे सहजशक्य होते, याचा आगळावेगळा आदर्श ग्रामस्थांनी समाजासमोर घालून दिला आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग