शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

लाभार्थीकडून लाच मागितली

By admin | Updated: August 22, 2014 21:43 IST

बदलीची मागणी : कणकवली पंचायत समिती बैठक

कणकवली : घरकुल योजनेच्या प्रस्तावाची रक्कम अदा करण्यासाठी लाभार्थीकडून पैशांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर बदलीची कारवाई करण्यात यावी, असा मागणी सदस्यांमधून करण्यात आली. सभापती मैथिली तेली यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. उपसभापती बबन हळदिवे, गटविकास अधिकारी एम.ए.गवंडी उपस्थित होते. तालुक्यातील एका गावातील महिला लाभार्थी असलेल्या घरकुलाचा प्रस्तावाची रक्कम मंजूर करण्यासाठी पंचायत समितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित लाच मागितली. ही बाब निंदनीय असून पुन्हा असे प्रकार होऊ नये, असे सदस्यांमधून सांगण्यात आले. महेश गुरव यांनी सांगितल्यानुसार त्या अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी, ्रअसा ठराव घेण्यात आला. गणेश चतुर्थीपूर्वी कालावधीत भारनियमन करू नये, अशी सूचना सुरेश सावंत यांनी मांडली. तालुक्यासाठी दहा वायरमनची मागणी केली आहे. सोमवारपर्यंत पाच कर्मचारी देण्यात येतील. ते आवश्यक त्या ठिकाणी वापरले जातील, असे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पिसेकामते गावात गेला महिनाभर रोज सायंकाळी ७ नंतर वारंवार वीज खंडीत होत असल्याकडे महेश गुरव यांनी लक्ष वेधले. कोणत्याही योजनेचे प्रशिक्षण आयोजित करताना त्याची पूर्वकल्पना सदस्यांना देण्यात यावी, अशी सूचना भाग्यलक्ष्मी साटम यांनी केली. बिडवाडी पशुसंवर्धन विभागाला जिल्हा परिषदेकडून मिनरल मिक्स्चर पावडर देण्यात आली होती. या पावडरच्या भरलेल्या पिशव्या आजूबाजूला पडलेल्या आढळल्या. याची चौकशी करण्यात यावी, अशी सूचना महेश गुरव यांनी मांडली. पियाळी नदीच्या दोन्ही बाजूच्या वळणांचे रूंदीकरण करण्यात यावे, असा ठराव घेण्यात आला. करंजे येथील अंध, अपंगांच्या विनाअनुदानित शाळेस पोषण आहार मिळत नाही. तालुक्यात अशा ५६ शाळा असून शासनाच्या माध्यमातून त्यांना पोषण आहार दिला जावा, अशी सूचना बाबा वर्देकर यांनी केली. जानवली सापळे गॅरेज येथील मोरी खचली असून नवीन बांधण्यात यावी अशी सूचना श्रीया सावंत यांनी केली. जानवली बौद्धवाडी येथील कॉजवे खराब झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. पंचायत समिती सेसच्या २० टक्के अनुदानातून घरदुरूस्ती, १० टक्के निधीतून अंगणवाडीसाठी वजनकाटे तसेच पशुसंवर्धन विभागाकडून पाच शेळ्या व एक बोकड वाटप योजनेचा करण्याबाबत ठराव घेण्यात आला. (प्रतिनिधी)