शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमार व्यावसायिकाकडून लाच प्रकरण :त्या दोघांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:20 IST

समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना पकडलेल्या पर्ससीननेट ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी एका मच्छिमार व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना जिल्हा विशेष न्यायाधीश एस. एस. घोडके यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देमच्छिमार व्यावसायिकाकडून लाच प्रकरण :त्या दोघांना न्यायालयीन कोठडीलाचलुचपत विभागाकडून मालवणात झाली कारवाई

सिंधुदुर्गनगरी : समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना पकडलेल्या पर्ससीननेट ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी एका मच्छिमार व्यावसायिकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेल्या मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना जिल्हा विशेष न्यायाधीश एस. एस. घोडके यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयात ही कारवाई करण्यात आली होती. यामुळे मत्स्यव्यवसाय विभागात एकच खळबळ उडाली होती. ३ जानेवारी रोजी रात्री मत्स्य व्यवसाय विभागाच्यावतीने समुद्रात गस्त घालत असताना एका स्थानिक मच्छिमाराचा पर्ससीननेटचा ट्रॉलर पकडण्यात आला होता.

हा ट्रॉलर जप्त करण्यात येईल, अशी भीती घालत या ट्रॉलरबरोबर अन्य एका ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांनी केली. ही रक्कम दिल्यास मे महिन्यापर्यंत तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही रक्कम तीन टप्प्यात द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. ही मागणी संबंधित मच्छिमाराने मान्य केली.याबाबतची तक्रार त्या मच्छिमार व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचत ४ जानेवारी रोजी सायंकाळी सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयात संबंधित मच्छिमार व्यावसायिक पहिल्या हप्त्यातील दोन लाख रुपयांची लाच देण्यास गेला असता ही रक्कम स्वीकारताना सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त व परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना त्या पथकाने धाड टाकत रंगेहाथ पकडले.

दरम्यान, रविवारी या दोन्ही संशयितांना जिल्हा विशेष न्यायाधीश एस. एस. घोडके यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी दोघांनाही ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.मंगळवारी दोघांचीही पोलीस कोठडी संपल्याने पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी विशेष न्यायाधीश एस. एस. घोडके यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. मत्स्य व्यवसाय आयुक्त वस्त यांच्यावतीने वकील संग्राम देसाई व अविनाश परब यांनी तर परवाना अधिकारी चव्हाण यांच्यावतीने वकील स्वरूप पई व यतीश खानोलकर यांनी काम पाहिले.मत्स्य विभागाचा कारभार चव्हाट्यावरया कारवाईत लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस हवालदार प्रथमेश पोतनीस, जनार्दन रेवंडकर, पोलीस नाईक अजित खंडे, रवींद्र पालकर हे सहभागी होते. मत्स्य व्यवसाय विभागात झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त हे किनारपट्टीवरील तिन्ही तालुक्यांचा कारभार पाहतात. त्यांच्यावर तसेच नव्यानेच भरती झालेल्या परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोन अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याप्रकरणी कारवाई झाल्याने मत्स्य व्यवसाय विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गBribe Caseलाच प्रकरण