शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

दोघांचे मृतदेह आज बाहेर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आंबोली : गडहिंग्लजमधून वर्षा पर्यटनासाठी आलेले दोन पर्यटक आंबोली-कावळेसाद येथील खोल दरीत बेपत्ता झाल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला होता. मंगळवारी दोघेही पर्यटक मृतावस्थेत कावळेसादच्या आठशे फूट खोल दरीत असलेल्या नदीच्या प्रवाहात आढळून आले आहेत. यातील एकाचा मृतदेह वर आणण्याचा प्रयत्न शोधपथकाने केला. मात्र, त्यांना यश आले नाही. ...

ठळक मुद्देइम्रानचे तीन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
लोकमत न्यूज नेटवर्कआंबोली : गडहिंग्लजमधून वर्षा पर्यटनासाठी आलेले दोन पर्यटक आंबोली-कावळेसाद येथील खोल दरीत बेपत्ता झाल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला होता. मंगळवारी दोघेही पर्यटक मृतावस्थेत कावळेसादच्या आठशे फूट खोल दरीत असलेल्या नदीच्या प्रवाहात आढळून आले आहेत.यातील एकाचा मृतदेह वर आणण्याचा प्रयत्न शोधपथकाने केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दाट धुके तसेच ज्या नदीपात्रात हा मृतदेह आहे, तेथे पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने मृतदेह वर आणणे शक्य झाले नाही. त्यामुळे ही शोधमोहीम थांबविण्यात आली असून, बुधवारी मृतदेह वर आणण्यात येणार आहेत. गडहिंग्लज-आजरा मार्गावरील अत्याळ येथील नंदिनी पोल्ट्रीमध्ये काम करणारे श्रीधर मगदूम, रमेश देसाई, राजेश चोरगे, अवधूत देवरकर, इम्रान गार्दी, प्रताप राठोड हे युवक व त्यांच्यासोबत पोल्ट्रीमालक दयानंद पाटील आंबोली येथे कारने वर्षा पर्यटनासाठी आले होते. या गु्रपने धनगरमोळा येथील धरणावर तसेच अन्य ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर सोमवारी ५ वाजण्याच्या सुमारास कावळेसाद येथे ते आले होते. तेथे यातील युवकांनी आणलेले जेवण घेण्याचा निर्णय घेतला. तर इम्रान गार्दी (२३ रा. हुनगीहाळ, ता. गडहिंग्लज-कोल्हापूर) व प्रताप राठोड (मराठवाडा-बीड) यांनी जवळच फिरून येतो म्हणून सांगून ते गेले ते आलेच नाहीत. सोबतच्या युवकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कावळेसाद येथे फिरायला आलेल्या एका पर्यटक महिलेला दोन युवक खोल दरीत पडताना दिसले होते. त्यामुळे ती तशीच ओरडत पार्किंगच्या दिशेने गेली. तेथे असलेल्या पर्यटकांनी धावाधाव केली. त्यांच्या त्यावेळी सोबत असलेल्या युवकांना इम्रान व प्रताप कुठे दिसत नसल्याने तेच दोघे दरीत पडले असावेत, असा त्यांचा समज झाला. सायंकाळ झाल्याने तसेच दाट धुके असल्याने खोल दरीत काही दिसत नव्हते. पण एक लाल शर्ट दिसत असल्यामुळे युवकांनी आपला मित्रच असल्याचे सांगितले. मात्र, रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होती.पुन्हा मंगळवारी सकाळपासून शोधमोहीम हाती घेण्यात आली. यात हिल राइडर्स एंड हायकर्स, समिट अँडव्हेंचर्स कोल्हापूर, बाबल आल्मेडा यांची सांगेली व आंबोली येथील आपत्कालीन टीम सहभागी झाली होती. तर ११ वाजण्याच्या सुमारास खास क्रेनही मागविण्यात आली. काही युवकांनी कावळेसाद पॉर्इंटच्या पायथ्याला शिरशिंगे-पारपोलीतून पायी चालत जाण्याचे निश्चित केले. या सर्वांनी जोरदार शोधमोहीम राबविल्यानंतर दुपारच्या सुमारास एक मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला. तर दुसरा मृतदेह सांगेलीच्या दिशेने नदी प्रवाहातून वाहत चालल्याचे शोध पथकातील काही युवकांनी पाहिले. जोरदार पाऊस तसेच दाट धुके यामुळे हाती आलेला मृतदेह वर आणणे शोधपथकाला शक्य झाले नाही.त्यामुळे आता बुधवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. शोधपथकांना दोन्ही मृतदेह दिसले असल्याने हे मृतदेह वर आणणे एवढेच शोधपथकांच्या हाती आहे. कावळेसादच्या वरच्या भागातून ही दरी तब्बल आठशे फूट खोल आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती आतमध्ये पडल्यानंतर ती जिवंत मिळणे कठीण होते. त्यातच मोठमोठे दगड व घनदाट जंगल असल्याने वरून पडलेली व्यक्ती सरळ पायथ्याला नदीत फेकली जाते. तसाच प्रकार या दोन युवकांच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे त्यांना वाचविणेही अशक्य बनले होते.वेगवेगळ््या शोधपथकांनी राबविली शोधमोहीमहिल राइडर्स एंड हायकर्स, समिट अँडव्हेंचर्स कोल्हापूरचे प्रमोद पाटील, विनोद कांबोज, सागर बकरे, विनायक काणेकर, मयूर लवटे, सचिन नरके, प्रसाद अडनाईक, वैभव जाधव, बाबल आल्मेडा यांची सांगेली आपत्कालीन टीम यामध्ये बाबल आल्मेडा, किरण नार्वेकर, अभय किनळोस्कर, पंढरीनाथ राऊळ, फिलिप आल्मेडा, संतान आल्मेडा, गुरुनाथ सावंत, संतोष नार्वेकर, सचिन नार्वेकर, सुमन राऊळ, बाबुराव कविटकर, अबीर आंचेकर, कृष्णा राऊळ, सुरेश राऊत तसेच आंबोली आपत्कालीन टीमचे शंकर गावडे, अमरेश गावडे, दीपक मेस्त्री आदी सहभागी झाले होते. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वास सावंत, कॉन्स्टेबल गुरुदास तेली, प्रकाश कदम, गजानन देसाई, कोलगोंडा आदी सहभागी झाले होते.इम्रानचे तीन वर्षांपूर्वीच झाले होते लग्नइम्रान याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला दीड वर्षाची मुलगी आहे. तो पाच वर्षांपासून अत्याळ येथील नंदिनी पोल्ट्रीमध्ये कामाला होता. तर प्रताप राठोड हा मराठवाडा-बीड येथील आहे. तो ऊसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात आला, तो पुन्हा गावी गेलाच नाही. दीड वर्षापासून या पोल्ट्रीमध्ये कामाला लागला होता. गडहिंग्लज तो येथे एकटाच राहात आहे.बांधकामचे दुर्लक्ष अनेकांच्या मृत्यूचे कारणआंबोली-कावळेसाद येथे बांधण्यात आलेले रेलिंग भरपूर खाली आहे. तसेच तेथे जे पाईप टाकण्यात आले आहेत, त्यांच्यावरही बांधकाम करणे गरजेचे आहे. अनेकजण त्यातून वाहून गेले आहेत. तर हे दोन युवक रेलिंगवरून खाली पडले. त्यामुळे बांधकाम विभागाने बांधलेले रेलिंग उंच करणे गरजेचे होते. पण तसे न केल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.