शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

त्या पुस्तकावर बंदी घालावी  : हिंदू जनजागृती समितीची गृहमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:56 IST

काँग्रेसने प्रसारित केलेल्या वीर सावरकर कितने वीर या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन देशात धार्मिक व जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने करीत या पुस्तकावर बंदी घालून लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे देशाच्या गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देत्या पुस्तकावर बंदी घालावी : हिंदू जनजागृती समितीची गृहमंत्र्यांकडे मागणी लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

मालवण : काँग्रेसने प्रसारित केलेल्या वीर सावरकर कितने वीर या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन देशात धार्मिक व जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने करीत या पुस्तकावर बंदी घालून लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे देशाच्या गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्यावतीने कुडाळ-मालवणच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना मालवण तहसील कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते शिवाजी देसाई, मधुसूदन सारंग, अशोक ओटवणेकर, चंद्रकांत भोजने, अनिकेत फाटक आदी उपस्थित होते.

वीर सावरकर कितने वीर? या पुस्तकात ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशहितासाठी व देशाच्या अस्मितेसाठी आयुष्य वेचले, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात आले आहेत. लेखकाने सावरकर व नथुराम गोडसे यांच्याविषयी चुकीची व अश्लाघ्य माहिती पुस्तकातून प्रसिद्ध केली आहे, त्यामुळे लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी.यापुढे सावरकर यांचाच नव्हे तर कोणत्याही राष्ट्रपुरुषांचा होणारा अपमान थांबविण्यासाठी शासनाने नवीन कायदा बनवावा. त्यात कठोर कारवाईची व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद असावी. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तत्काळ भारतरत्न म्हणून जाहीर करावे, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Hindu Janajagruti Samitiहिंदू जनजागृती समितीsindhudurgसिंधुदुर्ग