शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गचा बोंडू अल्पदरात चाललाय गोव्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:16 IST

fruits Sindhudurg- राजकीय अनास्थेमुळे काजू-बोंडू प्रक्रिया उद्योग रखडले असून, सिंधुदुर्गचा काजू बोंडू गोवा राज्यात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र येथील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा काजू बोंडू अल्पदरात गोव्यात जात आहे. सावंतवाडी तालुक्यात दोन सहकारी तत्त्वावर प्रकल्प नोंदणी करण्यात आले होते. मात्र या प्रकल्प संस्थाना शासन दरबारी योग्य ती सहकार्याची भूमिका मिळाली नसल्याने दोडामार्ग आणि आरोंदा येथील काजू उत्पादक सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्गचा बोंडू अल्पदरात चाललाय गोव्यात ! प्रकिया उद्योग उभारण्याची मागणी : सरकारची अनास्था कारणीभूत

अनंत जाधवसावंतवाडी : राजकीय अनास्थेमुळे काजू-बोंडू प्रक्रिया उद्योग रखडले असून, सिंधुदुर्गचा काजू बोंडू गोवा राज्यात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र येथील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा काजू बोंडू अल्पदरात गोव्यात जात आहे. सावंतवाडी तालुक्यात दोन सहकारी तत्त्वावर प्रकल्प नोंदणी करण्यात आले होते. मात्र या प्रकल्प संस्थाना शासन दरबारी योग्य ती सहकार्याची भूमिका मिळाली नसल्याने दोडामार्ग आणि आरोंदा येथील काजू उत्पादक सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत.गोवा आणि केरळ राज्याने काजू बागायतदार शेतकऱ्यांना काजू बीला हमीभाव दिला आहे. केरळ राज्याचे काजू बोर्डाची कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाली आहेत. मात्र महाराष्ट्रात काजूला हमीभाव नाही आणि मागणी असूनही काजू बोर्ड निर्माण झालेले नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात काजू बोंडूवर प्रक्रिया उद्योग नसल्याने ही बोंडू गोवा राज्यात निर्यात केला जातात. या बोंडूंना एका डब्यामागे १३ रुपये, तर दोडामार्ग भागांमध्ये किलोमागे २० किंवा २५ पैसे असा दर मिळतो. गोवा राज्यातील काजू फेणी किंवा काजू मद्यनिर्मिती प्रकल्पधारक कारखानदार दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील काजू बागायतीमधून ही बोंडूप्रक्रियेसाठी घेऊन जातात. या काजू बोंडापासून मद्यार्क निर्माण करतात. काजू प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी राजकीय आशीर्वादाची गरज आहे. मात्र राजकीय अनास्थेमुळे काजू बोंडूवर प्रक्रिया होत नाहीत.कोकण कृषी विद्यापीठाने काजू बोंडूवर प्रक्रिया करणारी छोटी छोटी यंत्रे तयार केली आहेत.मात्र त्यावर आधारित शासनाच्या सबसिडीसह उत्पादन आणि मार्केटिंगबाबत योजना नसल्यामुळे काजू बोंडू गोव्यातील कारखानदारांच्या दरानुसार विकावी लागत आहेत, असे काजू बागायतदार शेतकरी बोलताना सांगतात.काजू बागायतदारांच्या अडचणीत आणखी भरगोवा राज्यात महागड्या मद्यार्क निर्मितीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बोंडू फायदेशीर ठरत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय अनास्था शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे. फक्त श्रेयासाठी राजकारण तापले जाते, पण शेतकरी बागायतदार मात्र चिंताग्रस्त बनले आहेत.या हंगामात पर्यावरणातील बदल व अवकाळी पावसाने काजू बागायतदारांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

टॅग्स :fruitsफळेsindhudurgसिंधुदुर्ग