म्हापण : म्हापण खालचावाडा येथील श्रीकृष्ण उर्फ गुरु रमाकांत रावले (४५) यांचा मृतदेह घरापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या बागेतील विहिरीत गुरुवारी सकाळी सापडला.रात्री जेवण आटोपून ते घरातून बाहेर पडले होते. मात्र, सकाळपर्यंत ते घरी परतलेच नाहीत. सकाळी शोधाशोध केली असता विहिरीच्या काठावर त्यांचे चप्पल आढळले. नंतर बांबूच्या सहाय्याने शोधाशोध केली असता विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी बांबूच्या सहाय्याने मृतदेह विहिरीबाहेर काढला. याबाबतची माहिती त्यांचा चुलत भाऊ रणजित रामचंद्र रावले यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली.गुरु रावले हे पत्नी व दोन मुलांसह रहात होते. अतिशय कष्ट आपला उदरनिर्वाह चालवित होते. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास हवालदार कांबळी, एस. पी पाटकर, बाबा गिरकर व अनिकेत सावंत करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय, बहिणी असा परिवार आहे.
म्हापणमधील तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 12:43 IST
म्हापण खालचावाडा येथील श्रीकृष्ण उर्फ गुरु रमाकांत रावले (४५) यांचा मृतदेह घरापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या बागेतील विहिरीत गुरुवारी सकाळी सापडला.
म्हापणमधील तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला
ठळक मुद्देम्हापणमधील तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडलानिवती पोलीस ठाण्यात माहिती