शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात उद्यापासून जलपर्यटन बंद, पर्यटकांना बसणार बंदीचा फटका

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 25, 2024 14:18 IST

प्रवासी वाहतूक असोसिएशनने काही दिवसांची मागितली मुदतवाढ

संदीप बोडवेमालवण : पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारचे जलपर्यटन २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश बंदर आणि पर्यटन विभागाने जारी केले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी २६ मेपासून सागरी जलपर्यटन आणि सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंतीसाठी मालवण गाठणाऱ्या पर्यटकांचा या बंदीमुळे हिरमोड होण्याची शक्यता आहे. परंतु पर्यटकांची संभाव्य नाराजी टाळण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने बंदर विभागाकडे काही दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.मे महिन्यातील पर्यटन हंगाम १५ मेनंतरच मोठ्या प्रमाणात सुरू होतो. तरी मासेमारी हंगामाप्रमाणे आपणास ३१ मेपर्यंतचा हंगाम कायम करावा. याअगोदर हवामानाचा अंदाज घेऊन बंदर विभागाने काही दिवसांसाठी टप्याटप्याने मुदतवाढ दिलेली आहे, असे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी, वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे म्हणणे आहे. २०१६ मधील मुदतवाढ आदेशाची प्रतसुद्धा संघटनेने आपल्या निवेदनासोबत बंदर विभागाला सादर केली आहे.आता शासनाकडून या मागणीला प्रतिसाद मिळतो का, याकडे पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे. गतवर्षी पावसाळी हंगामामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जलपर्यटन बंद करण्यात आले. आता यावर्षीसुद्धा बंदर विभाग, पर्यटन विभाग आणि पर्यायाने शासन आपल्या भूमिकेवर ठाम राहते, की जलपर्यटन व्यावसायिकांना टप्प्याटप्याने काही दिवसांसाठी मुदतवाढ देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पर्यटकांना बसणाक बंदीचा फटकागतवर्षी २६ मेपासून हजारो पर्यटकांना जेटीवरूनच किल्ला दर्शन करावे लागले होते. मालवणात आलेले पर्यटक रॉक गार्डन आणि तालुक्यातील समुद्र किनारे फिरून माघारी परतत होते. ३१ मेपर्यंत मोठ्या संख्येने पर्यटक मालवणात येत होते. मात्र, २६ मेपासूनच्या जलपर्यटन बंदीचा फटका त्यांना बसला होता. जलपर्यटनासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, सागरी जलपर्यटनाबरोबर समुद्रात मालवाहतूक करणारी जहाजे तसेच नद्या किंवा तलावातील जलपर्यटनालासुद्धा ही बंदी लागू होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन