शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काळे झेंडे दाखवल्याचा राग काढतात; निलेश राणेंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:22 IST

वाळू पट्टे लिलावावरून सुरू असलेले आंदोलन हे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे. आपणास काळे झेंडे दाखवले म्हणून त्याचा असा राग काढत असतील तर ते योग्य नाही.

सावंतवाडी : वाळू पट्टे लिलावावरून सुरू असलेले आंदोलन हे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे. आपणास काळे झेंडे दाखवले म्हणून त्याचा असा राग काढत असतील तर ते योग्य नाही. शिवसेना-भाजपचे पदाधिकारी फक्त विषय समजावून घेण्यापूर्वी त्यात ढवळाढवळ करत आहेत. मलेशियाची वाळू जिल्ह्यात आणून जिल्ह्याची अधोगती करायची आहे का? असा सवाल महाराष्ट्र स्वाभिमानचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, नगरसेवक राजू बेग, सभापती पंकज पेडणेकर, उपसभापती संदीप नेमळेकर, सुधीर आडिवरेकर, विनायक ठाकूर, बांदा उपसरपंच अक्रम खान,  दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, नारायण राणे पालकमंत्री असताना कधी सिंधुदुर्गमध्ये वाळूसाठी आंदोलने होत नव्हती. पण आता सतत आंदोलने सुरू आहेत. पालकमंत्र्यांसह शिवसेना, भाजपच्या नेते मंडळींना प्रशासनातील काही समजत नाही. त्यामुळे एखादा विषय वाढत जात आहे. वाळू आंदोलन चिघळण्यामागे पालकमंत्री दीपक केसरकर हेच जबाबदार आहेत. त्यांना वाळूवाल्यांनी गेल्यावर्षी काळे झेंंडे दाखवले. त्याचा ते राग काढत आहेत. त्यामुळेच वाळू पट्टे लिलाव थांबले आहेत. असा राग काढणे योग्य नाही. पण मंत्री केसरकर यांची ही जुनी सवय आहे, अशी टीका यावेळी माजी खासदार राणे यांनी केली आहे. आता वाळू पट्टे लिलावाचा विषय मार्गी लावला आहे. मेरीटाईम बोर्डाचे सीईओ विक्रम कुमार यांनी यात लक्ष घातल्याने आता लिलाव प्रकिया जलद होईल. हा प्रश्न मी मार्गी लावला आहे. म्हणून श्रेय घेणार नाही. वाळू सुरू होणे महत्त्वाचे आहे, असे यावेळी राणे यांनी स्पष्ट केले.मच्छीमार आंदोलनात पालकमंत्री केसरकर यांनी चार दिवसांपूर्वी फक्त चर्चा केली. त्यावर उपाययोजना केल्या नाहीत. मग मार्ग कसा काय निघू शकतो? मच्छीमार आंदोलनात गोव्याची सरळ भूमिका आहे. गोवा शासन महाराष्ट्राच्या अन्न-औषध प्रशासनासोबत चर्चा करण्यास तयार आहे. पण मंत्री केसरकर हे त्यांच्या संपर्कात राहत नाहीत, असे खुुद्द गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आपल्याशी बोलले असल्याचे माजी खासदार राणे यांनी सांगितले. मी शनिवारी सायंकाळी गोव्यात त्यांची भेट घेतल्याचेही राणे यांनी सांगितले.राणे कुटुंबावर टीका करणा-या माजी आमदार परशुराम उपरकर यांचे कर्तृत्व काय? असा सवाल माजी खासदार राणे यांनी केला आहे. स्वत:च्या जीवावर पाच ग्रामपंचायत जिल्ह्यात ते निवडून आणू शकले नाहीत. त्यांनी राणेंवर टीका करावी यात दुर्दैव ते काय आणि राणे यांनी कधीही उपरकर यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले नव्हते, असेही राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग