शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

शिंदे गटाचा प्लॅन फसल्यास केसरकरांना भाजपचा पर्याय

By अनंत खं.जाधव | Updated: August 8, 2022 17:22 IST

भाजपच्या स्थानिक नेत्यांचीही भूमिका तेवढीच महत्वाची राहणार

अनंत जाधवसावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांचे पुढचे राजकीय भविष्य सध्यातरी अवघड दिसत आहे. सततची न्यायालयीन लढाई त्यातच मूळ शिवसेनेकडून बंडखोरांवर मारण्यात आलेला गद्दारीचा शिक्का या सगळ्या पार्श्वभूमीवर केसरकरांचा जर शिंदे गटाचा प्लॅन फसला तर त्यांना भाजप शिवाय पर्याय उरणार नसल्याचे आताच दिसू लागले आहे.मात्र या सगळ्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांचीही भूमिका तेवढीच महत्वाची राहणार आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेस विचारसरणीचा होता पण नंतर जसजसे नेते बदलले तस तशी विचारसरणी ही बदलू लागली गेल्या आठ वर्षांपासून या मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व दिसत आहे.मात्र त्या तुलनेत भाजप ही काहि कमी नाही 2014 मध्ये पहिल्यांदाच भाजपने विधानसभा निवडणूक लढवून अपेक्षे पेक्षा जास्त मते घेतली तर 2019 मध्ये शिवसेना भाजप युती चा उमेदवार म्हणून दीपक केसरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला असतना. भाजप नेते राजन तेली यांनी युतीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत केसरकरांच्या नाकात दम आणला या निवडणूकीत केसरकर अवघ्या तेरा हजार मतांनी निवडून आले होते.पण आता चित्र बदलले असून महाराष्ट्रातील शिवसेनेचे 40  आमदारांनी शिंदे गटात सामील होत बंडखोरी केली असून शिवसेनेला चांगलाच हादरा दिला आहे. यामध्ये सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचाही समावेश आहे.मात्र केसरकर हे जरी शिंदे गटात गेले असले तरी त्यांच्या सोबत सध्यातरी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच समर्थक गेल्याचे दिसून येत आहेत. केसरकर यांनी शिंदे गटात गेल्यानंतर आपल्या समर्थकांचा ना मेळावा घेतला ना बैठक घेतली त्यामुळे त्यांच्या सोबतचे चेहरे ही सध्या पडद्यामागे राहिले आहेत.मात्र असे असले तरी केसरकर यांची आता भाजपशी जवळीक वाढू लागली आहे.त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी सध्या सतत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी त्यानंतर येणारा निकाल शिवसेनेचे चिन्ह कुणाला मिळणार हे अद्याप निश्चित नाही त्यातच शिवसेनेकडून मारण्यात आलेला गददारीचा शिक्का या सगळ्या पार्श्वभूमीवर केसरकर यांचे राजकारण सध्यातरी अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे  भाजप शिवाय त्यांना पर्याय नसून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी केसरकर यांचे चांगले सबंध असले तरी स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांशी जुळवून घेण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलवावे लागेल.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDipak Kesarkarदीपक केसरकरEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा