शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मॉल उभारण्यावरून भाजप-शिवसेनेत झाली जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:54 IST

अत्याधुनिक शॉपिंग मॉल उभारण्याचा ठराव नगराध्यक्ष संजू परब यांनी गुरुवारी विशेष बैठकीत मांडला. मात्र, या ठरावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतरही तो ठराव सत्ताधाऱ्यांनी नऊ विरुद्ध तीन मतांनी जिंकला.

ठळक मुद्दे९ विरुद्ध ३ ने भाजपने ठराव जिंकला आॅनलाईन सभा अचानक आॅफलाईन कशी?; सावंतवाडी नगरपरिषद बैठक

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या मालकीच्या जुन्या कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीच्या जागेवर २४ गुंठे क्षेत्रात अत्याधुनिक शॉपिंग मॉल उभारण्याचा ठराव नगराध्यक्ष संजू परब यांनी गुरुवारी विशेष बैठकीत मांडला. मात्र, या ठरावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतरही तो ठराव सत्ताधाऱ्यांनी नऊ विरुद्ध तीन मतांनी जिंकला.

 या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. तसेच ही सभा बेकायदेशीर असल्याचे शिवसेनेच्या गटनेत्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी सांगितले. तर नगराध्यक्ष नगराध्यक्ष संजू परब यांनी २५ वर्षांनंतर शॉपिंग कॉम्प्लेस उभारण्यास नगरपरिषदेच्या बैठकीत बहुमताने संमती दिली गेली असल्याचा आनंद होत असल्याचे सांगितले.सावंतवाडी नगरपरिषद कौन्सिलची विशेष सभा नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह नगरसेविका दीपाली भालेकर, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, राजू बेग, नासीर शेख, बाबू कुडतरकर, भारती मोरे, अनारोजीन लोबोे, मनोज नाईक, डॉ. जयेंद्र परूळेकर आदी उपस्थित होते.या सभेच्या सुरुवातीलाच आॅनलाईन सभा असल्याने ती आॅफलाईन कशासाठी घेतली जात आहे. याकडे शिवसेना नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी लक्ष वेधले. मात्र, नगराध्यक्ष परब यांनी या सभेचे समर्थन करीत सभा सुरू केली.यावेळी अनारोजीन लोबो यांनी कोरोनाच्या साथीमुळे दोन नगरसेवक उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांना आॅनलाईन चर्चा करण्याची परवानगी दिली जावी, याकडे नगराध्यक्ष परब यांचे लक्ष वेधले. मात्र, नगराध्यक्षांनी त्याला नकार दिला.

यावेळी अनारोजीन लोबो यांनी आॅनलाईन सभा घेत असल्याचे कळविले आणि आता आॅफलाईन सभा घेत आहात असे सांगत सभा बेकायदेशीर आहे असे म्हटले. तीस वर्षे बीओटी तत्त्वावर मॉल उभारण्याची परवानगी दिल्यास नंतर ती इमारत जुनी होणार आहे. त्यामुळे याचा सर्वप्रथम विचार व्हायला हवा, असे लोबो म्हणाल्या.व्हीप बजावूनही सहा सदस्यांची अनुपस्थितीबाबू कुडतरकर यांनी वीज वितरणच्या जागेबाबत योग्य खुलासा करा याकडे लक्ष वेधले. तर अनारोजीन लोबो यांनी याठिकाणी असणारे भाडेकरू उद्ध्वस्त होतील असे सांगत बीओटी तत्त्वावर मॉल उभारण्यास विरोध केला. मात्र, ठराव मतदानासाठी घेतला. त्यावेळी सत्ताधारी नऊ नगरसेवकांनी मॉल उभारण्याच्या ठरावाला पाठिंबा दर्शविला तर शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी मॉल उभारण्यास विरोध दर्शविला.

मात्र, लोबो यांच्या शिवसेना-भाजपा गटातील व्हीप बजावूनदेखील सहा सदस्यांनी अनुपस्थिती दर्शविली. हा ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगत जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागू, असे लोबो म्हणाल्या.नगरसेवक राजू बेग यांनी कामगार कल्याणच्या २४ गुंठे जागेमध्ये बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेस उभारण्याबाबत ठराव मांडला. राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या गुंतवणूक करण्याच्या पार्श्वभूमीवर गंभीर नसल्याने बीओटी तत्त्वावर मॉल उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्या ठिकाणी वीज कंपनीची जागा वगळून तो उभारला जाईल याकडे राजू बेग यांनी लक्ष वेधले.मात्र, लोबो यांंनी जमिनीच्या ठिकाणी काही अडचणी आहेत. जुने गाळे भाड्याने दिले आहेत. खासगी जमीन आहे. याबाबत चर्चा व्हायला हवी आणि बांधा, वापरा व हस्तांतरित करा याचा नगरपरिषदेस काय फायदा होणार? असे विचारले.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग