शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

सावंतवाडी पालिका बैठकीत भाजप-शिवसेना आमने-सामने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 14:09 IST

Sawantwadi, MuncipaltyCarporation, Sindhudurngnews, Bjp, Shivsena सावंतवाडी नगरपालिकेच्या मासिक सभेत सुरुवातीला वादंग होणार हे निश्चित होते. त्याप्रमाणे तो झालाही. मात्र, नंतर सर्वच नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी सामंजस्याची भूमिका घेतली.

ठळक मुद्देसावंतवाडी पालिका बैठकीत भाजप-शिवसेना आमने-सामने गाळेधारकांवरील फेर लिलावाची टांगती तलवार टळली

सावंतवाडी : कोरोनामुळे उद्भवलेल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून पाच टप्प्यात प्रिमिअम वसूल करावा, असा एकमुखी ठराव झालेल्या सावंतवाडी नगरपालिकेच्या मासिक सभेत करण्यात आला. सुरुवातीला पालिका बैठकीत वादंग होणार हे निश्चित होते. त्याप्रमाणे तो झालाही. मात्र, नंतर सर्वच नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी सामंजस्याची भूमिका घेतली.

येथील पालिकेच्या व्यापारी संकुलातील ९ वर्षांचा करार संपलेल्या गाळ्यांचा फेर लिलाव न करता तीस वर्षांचा करार करण्याबाबत पुनर्विचार करावा. तसेच त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार २०१७ पासूनचे थकित भाडे तत्काळ वसूल करण्यात यावे.,असा एकमुखी ठराव झालेल्या सावंतवाडी नगरपालिकेच्या मासिक सभेत करण्यात आला.नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्याधिकारी संतोष जिरगे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, भाजपचे गटनेते राजू बेग, विरोधी गटनेत्या अनारोजीन लोबो, सभापती नासीर शेख, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, डॉ. जयेंद्र परुळेकर, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विर्नोडकर, दीपाली भालेकर, भारती मोरे, दीपाली सावंत आदी यावेळी उपस्थित होते.प्रिमियमची रक्कम वसूल करण्यासाठी टप्पे ठरवून देताना तारखा द्याव्यात व त्या न पाळल्यास व्याज लावावे. हे नियम न पाळणाऱ्यांचे गाळे ताब्यात घ्यावेत अशी सूचनाही यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली.आम्हांला नागरिकांनीच निवडून दिले आहे. त्यांच्या हिताचाच आम्ही विचार करणार. मात्र, सद्यस्थितीत पालिकेची पगार देण्याएवढीही परिस्थिती नसल्याने पालिका बुडवून इतरांचे हित साधणे कठीण आहे.

त्यामुळे व्यापारी व नगरपालिका यांचा योग्य समन्वय साधूनच हा निर्णय घेण्यात आल्याचेही यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्ट केले. आम्ही कोणताही नवीन निर्णय घेत नसून पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.व्यापाऱ्यांच्या कराची रक्कम ५० हजारप्रमाणे टप्प्याटप्प्याने वसूल करावीसावंतवाडी नगरपालिकेचे इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या तसेच बाप्पा नार्वेकर संकुलातील ९ वर्षांचा करार संपलेल्या गाळ्यांचा फेरलिलाव करू नये. त्यांना तीस वर्षांची वाढीव मुदत देण्यात यावी यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्ट केले. यापूवीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या काळात ३० जुलै २०१९ रोजी झालेल्या ठरावाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांसह त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार २०१७ पासूनचे वाढीव थकित भाडे तत्काळ वसूल करण्यात यावे. तसेच प्रिमियमची रक्कमही वसूल करावी.ही भूमिका नगरसेविका अनारोजीन लोबो यांनीच घेतली होती. त्यामुळे आता भूमिका बदलता येणार नाही. व्यापाऱ्यांचाही विचार करून प्रिमियमची रक्कम पाच टप्प्यात ५० हजारप्रमाणे टप्प्याटप्प्याने वसूल करावी, असा महत्त्वपूर्ण ठराव पालिकेच्या मासिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSawantwadiसावंतवाडीMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग