शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष-मोर्चेकऱ्यात हमरातुमरी, विकास आराखड्याविरोधात भाजपा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 13:43 IST

भाजपचा शहर विकास आराखड्याबाबतचा मोर्चा पालिकेवर धडकल्यावर निवेदन स्वीकारण्यास गेलेल्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या अरविंद मोंडकर व सुदेश आचरेकर यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष आपली बाजू मांडत असताना तुम्ही काहीच बोलू नका, तुमचा आम्ही धिक्कार करतो अशा शब्दात मोंडकर यांनी अटकाव केला.

ठळक मुद्देनगराध्यक्ष-मोर्चेकऱ्यात हमरातुमरी, विकास आराखड्याविरोधात भाजपा आक्रमक पालिका आवारात वातावरण काहीकाळ तंग

मालवण : भाजपचा शहर विकास आराखड्याबाबतचा मोर्चा पालिकेवर धडकल्यावर निवेदन स्वीकारण्यास गेलेल्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या अरविंद मोंडकर व सुदेश आचरेकर यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष आपली बाजू मांडत असताना तुम्ही काहीच बोलू नका, तुमचा आम्ही धिक्कार करतो अशा शब्दात मोंडकर यांनी अटकाव केला.

यावेळी आक्रमक बनलेल्या नगराध्यक्षांनी मी जनतेच्या सोबत आहे. माझ्या जनतेला विकास आराखड्यात अपेक्षित असलेले बदल करण्यास मी कटिबद्ध आहे असे सांगितले. यावेळी कांदळगावकर-मोंडकर यांच्यात जोरदार हमरातुमरी झाली. त्यामुळे पालिका आवारात काहीकाळ वातावरण तंग बनले होते.दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आणत भाजपने घोषणाबाजीसाठी आणलेला ध्वनिक्षेपक बंद केला.

मोर्चाच्या ठिकाणी गोंधळ उडाल्याने उपस्थित नागरिकांनी तेथून काढता पाय घेतला. अन्यायकारक शहर विकास आराखड्यावरून नगराध्यक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवून भाजपने आराखड्याविरोधात काढलेल्या मोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला नाही.माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि अरविंद मोंडकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. भरड दत्त मंदिर येथून बाजारपेठमार्गे पालिका असा निघालेल्या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सर्वपक्षीय मोर्चात भाजप, काँग्रेस आणि मनसे हे तीनच पक्ष सहभागी झाले होते. तर अनुपस्थित राहिलेले भाजपचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे हे चर्चेचा विषय बनले.भाजपच्यावतीने आयोजित केलेला मोर्चा पालिकेवर धडकला. पालिका आवारात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्याधिकारी जयंत जावडेकर व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आम्ही निवेदन देणार नाही, सर्वप्रथम आमच्या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावी, अशी विनंती केली.

यावर मुख्याधिकारी जावडेकर यांनी उपस्थितांना आराखड्याबाबतची प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, महेश जावकर, बाबा मोंडकर, नाना पारकर यांच्यासह काही नागरिकांनी आपली भूमिका प्रशासनासमोर मांडली.भाषणबाजीमुळे नागरीक विखुरलेमोर्चाचे निवेदन स्वीकारण्यास आलेल्या मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी मोर्चेकऱ्यांना कार्यालयात येण्याची विनंती केली. मात्र मोंडकर यांनी आम्ही उन्हातच राहणार आहोत. आम्हाला एसी केबिनमध्ये येऊन काही बोलायचे नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांची एका मागून एक भाषणे सुरू झाल्यानंतर मोर्चात आवाहन करून सहभागी झालेले नागरिक विखुरले गेले. मोर्चाची सांगता होईपर्यंत पालिका आवारात तुरळक नागरिक उपस्थित होते.नागरिकांनी व्यक्त केली नाराजीनगराध्यक्षांना त्यांची भूमिका स्पष्ट करू न दिल्याने मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मोंडकर यांचे रौद्ररूप पाहून पोलिसांनी ध्वनिक्षेपक बंद केला. यावेळी शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत मोंडकर हे मनमानी करत आहेत. नगराध्यक्ष बोलले तर वस्तुस्थिती समोर येईल या भीतीनेच आचरेकर यांनी बोलायला दिले नाही, असा आरोप केला. 

टॅग्स :Morchaमोर्चाBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग