शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाईकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा सतीश सावंत यांना फटका!, संतोष कानडे यांचा टोला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 19:27 IST

राजन तेली हे निवडून येऊ नये असे ईश्वराचे मत होते. तर सतीश सावंत, सुरेश दळवी, अविनाश माणगावकर आदी त्यांच्या पॅनलचे लोक जिल्हा बँकेत निवडून आले नाहीत. हा कशाचा संकेत होता? याचे उत्तर त्यांनी द्यावे.

कणकवली : शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावर टीका केली आहे. सुशांत नाईक जर असे म्हणत असतील कि, राजन तेली हे निवडून येऊ नये असे ईश्वराचे मत होते. तर सतीश सावंत, सुरेश दळवी, अविनाश माणगावकर आदी त्यांच्या पॅनलचे लोक जिल्हा बँकेत निवडून आले नाहीत. हा कशाचा संकेत होता? याचे उत्तर त्यांनी द्यावे. मात्र, नाईकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा सतीश सावंत यांना फटका बसला आहे. हे मात्र सत्य आहे. असा टोला भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी लगावला आहे.नगरसेवक तथा सिंधुदुर्गं जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुशांत नाईक यांनी बुधवारी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजन तेली यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर संतोष कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्हा बँक निकालाच्या घडामोडी घडल्यानंतर नाईक कंपनीने सतीश सावंत यांना आगामी विधानसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून पण बाजूला केले आहे हे दिसून येते. दुसरे सांगायचे झाले तर, जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत सतीश सावंत यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला होता. त्यामुळे सुडाच्या भावनेतून प्रमोद वायंगणकर यांच्या माध्यमातून नाईक कंपनीने सतीश सावंत यांचा घात केला नसेल कशावरून ? त्याचबरोबर ते राजन तेली यांच्या पराभवाचे बोलत असतील तर, आमदार वैभव नाईक यांचे वडील यांना पण ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. वैभव नाईक, सतीश सावंत , संदेश पारकर हे नेते कितीवेळा पराभवाला सामोरे गेले याचे आत्मपरीक्षण नाईक कंपनीने करावे.  आपल्या विजयाची गाथा जनतेला तुम्ही सांगत असाल तर २२ वर्षानंतर आपल्या वडीलांच्या नावे मते मागायची वेळ तुमच्यावर का आली ? त्या सहानुभूतीवर आपण निवडून आलात हे विसरू नका.तुमच्या वरिष्ठांचा विश्वास जर तुमच्यावर होता तर दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी राजन तेली यांच्या घरी का आले ? ते नाईक कंपनीकडे का नाही आले ? त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर टीका करताना नाईक कंपनीने विचार करून बोलावे. तरच त्यांना पुढील दिवस चांगले जातील असेही संतोष कानडे यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाShiv Senaशिवसेना