शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 10:56 IST

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले ...

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. गुरुवारी रात्री १२.३० वाजता ही घटना घडली आहे. सुधीर चव्हाण हे भाजपच्या तिकिटावर कुडाळ नगरपंचायतची प्रभाग १६ मधून निवडणूक  लढवत होते.गुरुवारी रात्री ११.३० वाजता आपल्या प्रभागातील प्रचार आटपून ते कुडाळ मधील भाजपच्या कार्यालयात आले. यानंतर ते एके ठिकाणी जायला निघाले. तेथे पोचल्यावर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले.त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, छोटा मुलगा आणि आई असा परिवार आहे. ते कुडाळ मधील डॉक्टर बाणवलीकर यांना कृत्रिम दात पुरवठा करण्याचा व्यवसाय करीत होते.ते क्रिकेट अप्रतिम खेळायचे. सुधीर हे मूळचे मालवणचे होते. पण गेली कित्येक वर्षे ते कुडाळात व्यवसायानिमित्त स्थायिक झाले होते. त्यामुळे कुडाळात त्यांचा मोठा मित्र परिवार होता. कुडाळातील लोकांशी आणि मित्रपरिवारांशी त्यांची नाळ जुळलेली होती.त्यांचा मृतदेह कुडाळ रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. सकाळीच शवविच्छेदन करून नंतर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सुधीर चव्हाण यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबातील लोकांवर मोठे संकट उभे राहिले आहे. तर त्यांच्या मित्र परिवाराला देखील मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळElectionनिवडणूकBJPभाजपा