शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : गव्याची रिक्षाला धडक! सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ सिंधुदुर्गातील असल्याची अफवा

By अनंत खं.जाधव | Updated: September 12, 2022 14:35 IST

हा व्हिडीओ कर्नाटक किंवा केरळ येथील असल्याचे स्पष्टीकरण वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिले. तसेच या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

सावंतवाडी -  गव्याने एका रिक्षेला धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सावंतवाडी तालुक्यातील असनिये येथील असल्याचे बोलले जात आहे. तर कुण हा व्हिडिओ राधानगरी फोडा येथील असल्याचे सांगत आहेत. मात्र, या व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता, तसेच वनविभागाशी सर्पक केला असता हा व्हिडीओ कर्नाटक किंवा केरळ येथील असल्याचे स्पष्टीकरण वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिले. तसेच या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात गवा रेड्यानी गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरी आंबोली आजरा मार्गावर कारला धडक दिली तर माजगाव सावंतवाडी मार्गावर गवा रेड्याने कारला दिलेल्या धडकेत अनेक जण जखमी ही झाले होते.या सर्व घटना ताज्या असतनाच अचानक गव्याने एका रिक्षेला धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला.

त्यामुळे सर्वचजण अवाक झाले हा व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असावा असेच सर्वाना वाटू लागले त्यानंतर प्रत्येकजण हा व्हिडिओ प्रत्येक गावा पुढे जोडून व्हायरल करू लागले अनेकांनी तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ सावंतवाडी तालुक्यातील असनिये येथील असल्याचे सांगत व्हायरल केला आहे. मात्र लोकमत ने या व्हिडिओ मागची  सत्यता पडताळून पाहिली असता या व्हिडिओमधील भाषा ही केरळ तामिळनाडूतील असल्याचे ऐकू येऊ आले तर रिक्षा ही त्याच परिसरातील असल्याचे दिसून आले.

त्यामुळे हा व्हिडिओ केरळमधील असल्याचे स्पष्ट होत आहे. तरीही लोकमत ने सावंतवाडी  वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना विचारले असता त्यांनी हा व्हिडीओ सावंतवाडी तालुक्यात असनिये भागातील नाही, अशी कोणतीही घटना तेथे घडल्याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही असे सागितले.

तसेच  हा व्हिडिओ केरळ किंवा तामिळनाडू कर्नाटक येथील आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काही सोशल मीडियावर हा व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणून फिरत असले तर ती अफवा असून कोणी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ही वनक्षेत्रपाल क्षीरसागर यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKeralaकेरळKarnatakकर्नाटकforestजंगल