शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कावळेसाद खोऱ्यात राबविणार जैवविविधता संशोधन मोहीम, तज्ज्ञांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 17:25 IST

AmboliHillStation, tourism, sindhudurg सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहसी क्रीडा पर्यटनाचा अभिनव अध्याय सुरू करणारी कावळेसाद रॅपलिंग आणि कावळेसाद खोऱ्यातील जैववैविधता संशोधन पदभ्रमंती ही साहसी मोहीम डिसेंबरच्या २६ व २७ तारीखला आयोजित केली असल्याची घोषणा सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध गिर्यारोहक रामेश्वर सावंत यांनी केली.

ठळक मुद्देकावळेसाद खोऱ्यात राबविणार जैवविविधता संशोधन मोहीम, तज्ज्ञांचा सहभाग सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबतर्फे २६, २७ डिसेंबरला आयोजन

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहसी क्रीडा पर्यटनाचा अभिनव अध्याय सुरू करणारी कावळेसाद रॅपलिंग आणि कावळेसाद खोऱ्यातील जैववैविधता संशोधन पदभ्रमंती ही साहसी मोहीम डिसेंबरच्या २६ व २७ तारीखला आयोजित केली असल्याची घोषणा सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध गिर्यारोहक रामेश्वर सावंत यांनी केली.याबाबत माहिती देताना सावंत म्हणाले की, आंबोली या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी ह्यकावळेसादह्ण हा पर्यटकांना सदैव मोहविणारा सह्याद्रीचा कातळकडा परिसर आहे. पावसाळ्यात या सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारे जलप्रपात-पाणी त्या विलोभनीय खोऱ्यातून पार शिरशिंगे गावात पोहोचते.

या खोऱ्यात बहुमूल्य जैववैविधता आहे. अशा या खोऱ्यात कावळेसाद कड्यावरून पहिले अंदाजे २५० फूट खोल दरीत रॅपलिंग करीत सदस्य खाली उतरतील. तिथून थोडी उतारचाल झाल्यावर पुन्हा थोडे रॅपलिंग करतील आणि या अजस्त्र खोऱ्यात पोहोचतील.हा पहिला टप्पा पार पडल्यानंतर खोऱ्यातून इथल्या पशुपक्षी-पाखरे, दुर्मीळ वनस्पती, कीटक, दगड यांचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण करीत खोऱ्यातून पदभ्रमंतीचा अविस्मरणीय साहस-आनंद अनुभवतील. दुर्मीळ क्षण कॅमेरात टिपतील, नोंदी घेतील. रात्रीचा मुक्काम अर्थातच निबिड जंगलात कॅम्पसाईट तयार करून केला जाईल. रात्री सामूहिक जेवण बनविणे, अनुभव कथन, मार्गदर्शन असा कार्यक्रम होईल.या मोहिमेसाठी रॅपलिंगच्या पूर्वानुभवाची आवश्यकता नाही. मात्र दाट जंगल भागात, डोंगरदऱ्यांतून आपले साहित्य घेऊन चालण्याइतकी शारीरिक क्षमता असावी. सहभागी सदस्यांची सर्वतोपरी काळजी आणि वनविभागाच्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.पदभ्रमंती मार्गात सापडून येणारा प्लास्टिक तत्सम कचरा जमा करून तो आणला जाणार आहे. या मोहिमेत जैवविविधता व वनस्पती तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे, पक्षी तज्ज्ञ डॉ. योगेश कोळी मार्गदर्शन करणार आहेत. मोहिमेच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनtourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग