शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वणव्यामुळे जैवविविधता नष्ट

By admin | Updated: March 24, 2015 00:13 IST

वनसंपदा बेचिराख : वणवे लावणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

सुभाष कदम - चिपळूण तालुक्यात आजही वणवे लावण्याचे प्रकार सुरुच आहेत. या वणव्यामुळे वनसंपदा बेचिराख होत असून, डोंगर काळेकुट्ट दिसत आहेत. त्यामुळे वन्य प्राणीही अडचणीत येऊ लागले आहेत. जैवविविधता नष्ट होत असल्याने वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.उन्हाळ्यात चिपळूण परिसरात पर्यटनासाठी बाहेरगावाहून अनेक पर्यटक येतात. मात्र, याच काळात वणवे लावण्याचे प्रमाणही जास्त असते. वणव्यामुळे विविध प्रकारच्या वनस्पती, वृक्ष, फुलझाडे, शेतीसाठीचे गवत, कवळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. लहान मोठे जीव व वन्य प्राणीही या वणव्याच्या तडाख्यातून सुटत नाहीत. त्यामुळे वन्य प्राण्याच्या अनेक प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक पक्ष्यांची घरटी, अंडी हेही यातून वाचत नसल्याने पक्ष्यांच्या दुर्मीळ जातीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आंबा, ऐन, किंजळ, करवंदीची झुडपं, उंबर आदी अनेक जंगली झाडे जळून खाक होतात. साप, ससे, लांडगा, भेकर, कोल्हे, रानकुत्रे, मोर आदी वन्य प्राणीही नष्ट होत आहेत. कोकणामध्ये साधारणता जानेवारी महिना संपला की, विघ्नसंतोषी लोक आगी लावण्याचे काम करतात. वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. परंतु, आजपर्यंत याबाबत कोणावरही कारवाई झालेली नाही. वणवा लावणाऱ्याचे नाव सांगणाऱ्यालाही बक्षीस जाहीर करण्यात आले होते. परंतु, वन खात्याची योजना केवळ कागदावर राहिली आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनस्तरावरच यासाठी कठोर पावले उचलून अंमलबजावणी झाली तरच काहीअंशी यावर नियंत्रण येईल. सध्या शेती करण्याचे प्रमाण घटल्याने जमीन मोठ्या प्रमाणात पडीक राहाते. या जमिनीत गवत वाढते आणि त्या गवताला वणवे लावले जातात. या वणव्यात कोणाचे नुकसान होईल, याचा साधा विचारही केला जात नाही. यामुळे नाराजी आहे. शासनस्तरावर अशा कठोर उपायांची मागणी केली जात असली तरी अंमलबजावणी करण्यात येत नसल्याची काहींनी तक्रार केली आहे. कोकणात वणवा लावण्याचे काम गेली कित्येक वर्षे केले जात आहे. अनेक डोंगरात ही परिस्थिती निर्माण होत असल्याने काहिंनी चिंता व्यक्त केली आहे. वनकायदे वेळोवेळी जाहीर झाले. मात्र, वणवे लावणाऱ्यांवर किती प्रमाणात कारवाई केली गेली आहे, याबाबतची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी होत आहे.