शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

औद्योगिक संस्थेत कोट्यवधीचा अपहार; महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:25 IST

कणकवली तालुक्यातील दिगवळे येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेत सहकाऱ्यांसह कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राजक्ता प्रकाश कदम (४६, रा. कलमठ, कणकवली) या महिलेला सोमवारी अटक केली. तब्बल १ कोटी २२ लाख ६६ हजार ६४० रुपयांचा अपहार झाला असून, उपलेखा परीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून १२ संशयितांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देऔद्योगिक संस्थेत कोट्यवधीचा अपहार; महिलेला अटक१२ जणांवर गुन्हा दाखल : आर्थिक गुन्हा शाखेकडे तपास

कणकवली : कणकवली तालुक्यातील दिगवळे येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेत सहकाऱ्यांसह कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राजक्ता प्रकाश कदम (४६, रा. कलमठ, कणकवली) या महिलेला सोमवारी अटक केली. तब्बल १ कोटी २२ लाख ६६ हजार ६४० रुपयांचा अपहार झाला असून, उपलेखा परीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून १२ संशयितांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.दरम्यान, प्राजक्ता कदम हिला कणकवली न्यायालयात मंगळवारी हजर केले असता न्यायाधीश एस. ए. जमादार यांनी १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे ११ जुलै २००८ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत कार्यरत असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी ही अफरातफर केली असल्याचे उप लेखापरीक्षकांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.या संस्थेला शासनाने अदा केलेल्या रकमेपैकी ९८ लाख ९६ हजार ६४० रुपये व सभासदांकडून जमा केलेल्या भागभांडवलापैकी २३ लाख ७० हजार रुपये असा १ कोटी २२ लाख ६६ हजार ६४० रुपयांचा अपहार झाला आहे.

या निधीचा योग्य प्रकारे विनियोग केल्याचे कोणतेही पुरावे मूळ दस्ताऐवज वगैरे कागदपत्र लेखा परीक्षकांना संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी सादर केलेली नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी वरील निधीचा अपहार झाल्याचे समोर आले होते. तसेच शासकीय अनुदानाचा गैरवापर झाला असल्याने उप लेखापरीक्षक प्रशांत बळीराम दळवी (रा. ओरोस) यानी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.या प्रकरणी प्राजक्ता कदम हिच्यासह बारा संशयितांवर पोलिसानी विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला होता. तर या प्रकरणाचा अधिक तपास सिंधुदुर्ग आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. पी. बर्वे करीत होते . त्यांनी तपासाअंती प्राजक्ता कदम हिला अटक केली.तिला मंगळवारी कणकवली येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

सरकारी पक्षाच्यावतीने ?ड. गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयाकडे प्राजक्ता कदम हिच्या पोलीस कोठडीची मागणी करताना अपहार केलेल्या रकमेचे काय केले? तयार केलेल्या बोगस कागदपत्रांचा सखोल तपास करायचा आहे. अशी विविध कारणे मांडली.

दरम्यान, याप्रकरणी इतर संशयित आरोपीना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. तर इचलकरंजी येथील शिंदे नामक व्यक्तीच्या बँक खात्यावर अपहारापैकी ९० लाख रुपये जमा केल्याची माहिती समोर येत असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असल्याचे समजते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग