शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी, शिरगाव येथील घटना 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 29, 2024 13:42 IST

हल्ल्याची पंधरा दिवसांतील दुसरी घटना

दिनेश साटमशिरगाव : देवगड तालुक्यातील शिरगाव-कुवळे मार्गावर शिरगाव चौकेवाडी फाट्यानजीक बाबल्या गणपत पवार या दुचाकीस्वारावर गव्याने केलेल्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना काल, गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली.साळशी ओहोळानजीक कातकरी समाजाच्या वस्तीत राहणारे बाबल्या गणपत पवार हे शिरगावहून आपल्या (एमएच ०७, एक्यू ५४२) या दुचाकीने घराकडे जात असताना चौकेवाडी फाट्यानजीक त्यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने दुचाकीची चेस मोडली असून, बाबल्या पवार यांनाही उजव्या हाताला आणि पायाला मार बसला आहे. ही घटना घडल्यानंतर याच मार्गावरून त्यांच्याच वस्तीत राहणारे सत्यवान पवार हे पत्नीसह दुचाकीवरून प्रवास करत असताना बाबल्या पवार हे गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने शिरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना शुक्रवारी अधिक उपचारांसाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, देवगड वनपाल सारीक फकीर यांना माहिती मिळताच घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. तसेच जखमीचीही रुग्णालयात उपचार घेत असताना विचारपूस केली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शिरगाव विभागप्रमुख मंगेश फाटक, अजित परब, मंगेश शिंदे, सूर्यकांत तावडे, राजेंद्र पोकळे, कातकरी समाजबांधव उपस्थित होते.

गव्यांच्या वावरामुळे भीतीदेवगड-नांदगाव मार्गावर शिरगाव राकसघाटी तसेच शिरगाव-कुवळे या मार्गावर दिवसेंदिवस गव्यांचा वावर वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिरगाव-कुवळे मार्गावर तिन्हीसांजेनंतर खासगी वाहनांची वर्दळ गव्यांचा वावर वाढल्याने भीतीमुळे कमी झाली आहे. वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

हल्ल्याची पंधरा दिवसांतील दुसरी घटना९ मार्च रोजी रात्री देवगड-नांदगाव मार्गावर शिरगाव राकसघाटी येथे चारचाकी गाडीवर गव्याने हल्ला करून दर्शनी भागाची काच फोडली होती. केवळ दैव बलवत्तर म्हणून चारचाकीतील प्रवासी वाचले होते. त्यानंतर शिरगाव-कुवळे मार्गावर पुन्हा गव्याच्या हल्ल्याची पुनरावृती झाल्याने ग्रामस्थ तसेच वाहनचालकांत भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग