शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध: बांदा येथे मराठा समाजाची दुचाकी रॅली

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 7, 2023 18:55 IST

बांदा ( सिंधुदुर्ग ) : जालना जिल्ह्यातील सकल मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी बांदा येथे ...

बांदा (सिंधुदुर्ग) : जालना जिल्ह्यातील सकल मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी बांदा येथे सकल मराठा बंधू-भगिनींनी दुचाकी रॅली काढली. यामध्ये मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते.

सकाळी अकरा वाजता बांदेश्वर मंदिर येथून ही बाईक रॅली निघाली. शहरातील मोर्येवाडा, तेली तिठा, उभा बाजार, गांधी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्टँडमार्गे गडगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला.जालना जिल्ह्यातील सरोटे गावात मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील व मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष राजाराम ऊर्फ बाळू सावंत यांनी केला. संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. आम्ही गावागावांतून या घटनेचा निषेध करत आहोत. मराठा समाजाची किंमत आणि हिंमत आम्ही मराठ्यांवर लाठीहल्ला करून रक्त सांडणाऱ्यांना दाखवून देऊ, असे बाळू सावंत यावेळी म्हणाले.यावेळी म. गो. सावंत म्हणाले, राज्यकर्त्यांनी त्वरित निर्णय घेऊन व विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षणासाठी ठराव संमत करावा. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा शासन निर्णय त्वरित काढून, मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी केली.या दुचाकी रॅलीमध्ये राजाराम ऊर्फ बाळू सावंत, माजी अध्यक्ष नीलेश मोरजकर, ज्ञानेश्वर सावंत, गुरू सावंत, स्वप्निल सावंत, विराज परब, साई सावंत, मिलिंद सावंत, जयवंत राणे, विहान राणे, परिमल सावंत, सागर सावंत, मकरंद तोरस्कर, राकेश परब, मयूर चराटकर, दीपक सावंत यांच्यासह वाफोली, डिंगणे, शेर्ले, इन्सुली व परिसरातील बहुसंख्य मराठा बांधव सहभागी झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaratha Reservationमराठा आरक्षणjalna-acजालना