वैभववाडी : भुईबावडा घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रस्त्यावर आलेले दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने बाजारपेठेवर काही प्रमाणात परिणाम दिसून आला.वैभववाडी तालुक्यात शनिवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे पहाटे भुईबावडा घाटात दरड कोसळली. दरडीचे दगड, माती रस्त्यावर आल्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गस्तीवर असलेल्या वैभववाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर आलेले व रहदारीला अडथळा ठरणारे दगड बाजूला केले. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला दरड कोसळल्याची माहिती मिळाली. त्यामुळे बांधकाम विभागाने उशिरा संपुर्ण दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान तालुक्यात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभर पावसाची काहीशी संततधार सुरू होती. त्याचा परिणाम काही प्रमाणात बाजारपेठेत दिसून आला. तर गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांचा पावसाने पुरता हिरमोड केला आहे.सिंधुफोटो ०१भुईबावडा घाटात कोसळलेली दरड हटवून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
भुईबावडा घाटात दरड कोसळली, पोलिसांनी वाहतूक केली सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:52 IST
भुईबावडा घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रस्त्यावर आलेले दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने बाजारपेठेवर काही प्रमाणात परिणाम दिसून आला.
भुईबावडा घाटात दरड कोसळली, पोलिसांनी वाहतूक केली सुरळीत
ठळक मुद्देभुईबावडा घाटात दरड कोसळलीपोलिसांनी वाहतूक केली सुरळीत