शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत ‘भिलवाडा रॅपिड टेस्ट’ पॅटर्न  राबविणार : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 17:01 IST

कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, मंगळवार आठवडा बाजाराच्या दिवशी कणकवली शहरात गर्दी होऊ नये, आठवडा बाजार पूर्णत: बंद ठेवला जावा,  फक्त जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकाने खुली राहतील.

ठळक मुद्देनगरपंचायत आढावा बैठकीत निर्णय, २०  हजार ‘रॅपिड टेस्ट किट्स’ उपलब्ध करून देणार

कणकवली : कोरोना विरूद्धच्या लढ्यात ‘रॅपिड टेस्ट’ ही काळाची गरज आहे. प्रशासनाकडून हे काम होईल तोपर्यंत वाट पाहत बसण्यात काहीच अर्थ नाही. किमान नगरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट आपण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारे २०  हजार ‘रॅपिड टेस्ट किट्स’ मी उपलब्ध करून देईन. केरळ राज्य व भिलवाडा जिल्ह्याने राबविलेला ‘रॅपिड टेस्ट’पॅटर्न कणकवलीत सुद्धा यशस्वीपणे राबवू, असा विश्वास आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केला.

कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, मंगळवार आठवडा बाजाराच्या दिवशी कणकवली शहरात गर्दी होऊ नये, आठवडा बाजार पूर्णत: बंद ठेवला जावा,  फक्त जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकाने खुली राहतील. विनाकारण गर्दी होणार नाही. यासंदर्भात प्रशासन, व्यापारी, पोलीस अधिकारी यांच्यासमवेत आमदार राणे यांनी सविस्तर चर्चा केली.

मंगळवारी आठवडा बाजार पूर्ण बंद ठेवण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, नगरसेवक विराज भोसले,  मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, संजय कामतेकर, बंडू हर्णे, अभिजीत मुसळे, शिशिर परुळेकर यांच्यासह व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.

 

कणकवली कोरोनामुक्त?

शहरातील नागरिकांच्या रॅपिड टेस्टसाठी नगरपंचायतीने प्रत्येक प्रभागनिहाय कर्मचारी नियुक्त करावेत. वैद्यकीय अधिकाºयांची मदत घेऊन ही टेस्ट केली जाईल. कोरोना रुग्ण पहिल्यांदा निगेटिव्ह रिपार्ट आले तरी २३ दिवसांनी पॉझिटिव्ह आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ‘रॅपिड टेस्ट’ ही प्रत्येकाची झाली पाहिजे. त्यानंतर उपचार करणे सोपे होईल. त्यासाठीचे किट्स मागवून घेतो आणि प्रभागनिहाय तपासणी करून कणकवली शहर कोरोनामुक्त असल्याचे जाहीर करू, असेही ते यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग