शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भालचंद्र नेमाडेंना औरंगजेबाची महती वाढवायची आहे, असे प्रकार खपवून घेणार नाही - नितेश राणे 

By सुधीर राणे | Updated: August 8, 2023 16:59 IST

अशा लोकांचे पुरस्कार परत घ्यावेत

कणकवली:  छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आणि आदर्श आहेत. त्यांना औरंगजेबापेक्षा लहान दाखवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. अशा लोकांना देशात पुरस्कार देऊ नयेतच आणि यापूर्वी दिले असतील तर ते परत घ्यावेत अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारकडे केली आहे.आमदार राणे यांनी आज, मंगळवारी कणकवली येथील निवासस्थानी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले औरंगजेबाने जुलूम केले, अत्याचार केले. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे समजायचे आणि छत्रपतींना इतिहासात लहान करायचे असे जे षडयंत्र चालू आहे. त्याला भालचंद्र नेमाडे हे खतपाणी घालत आहेत. औरंगजेब हिंदू द्वेषी नव्हता असे सांगून नेमाडे यांना औरंगजेबाची महती वाढवायची आहे. असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असेही ते म्हणाले.मातोश्रीचा टोल बंद झाल्याने मुंबईचे टोल आठवले ते पुढे म्हणाले, ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत हे अकलेचे तारे तोडत आहेत. त्यांचा पुढील मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये असेल. मातोश्रीचा टोल बंद झाल्याने आदित्य ठाकरे यांना आता मुंबईचे टोल आठवले आहेत. मात्र, मातोश्री २ कोणाच्या पैशातून बांधली. गुजराती आणि मारवाडी समाजाचे पैसे किती लागले याचा हिशोब त्यांनी द्यावा असे आव्हान नितेश राणे यांनी यावेळी दिले.महायुतीचीच सत्ता येणार अमित शहा  हे २०२४ मध्ये पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढतील, कारण महायुतीचीच पुन्हा सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज