शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भालचंद्र नामाचा गजर; कनकनगरी दुमदुमली, कणकवली शहरातून पालखी मिरवणूक, भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 17:58 IST

दिगंबरा, दिगंबरा, भालचंद्र बाबा दिगंबराच्या जयघोषाने रविवारी सायंकाळी कणकवलीनगरी दुमदुमून गेली. निमित्त होते ते येथील श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराजांच्या ४० व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहरातून काढण्यात आलेल्या सवाद्य पालखी मिरवणुकीचे. अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

ठळक मुद्देदिगंबरा, दिगंबरा, भालचंद्र बाबा दिगंबराच्या जयघोषाने कणकवलीनगरी दुमदुमलीपरमहंस भालचंद्र महाराजांच्या ४० व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने कणकवलीतून सवाद्य पालखी मिरवणुक वारकऱ्यांच्या साथीने सवाद्य पालखी मिरवणूक

कणकवली :  दिगंबरा, दिगंबरा, भालचंद्र बाबा दिगंबराच्या जयघोषाने रविवारी सायंकाळी कणकवलीनगरी दुमदुमून गेली. निमित्त होते ते येथील श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराजांच्या ४० व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहरातून काढण्यात आलेल्या सवाद्य पालखी मिरवणुकीचे. अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.२२ नोव्हेंबरपासून येथील आश्रमात परमहंस भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला होता. रविवारपर्यंतच्या कालावधीत याठिकाणी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काकडआरती, समाधी पूजन, भालचंद्र महारुद्र महाअभिषेक अनुष्ठान, आरती, भजने, कीर्तन महोत्सव तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता.

रविवारीही पुण्यतिथी दिनानिमित्त पहाटे ५ वाजल्यापासून काकड आरतीने धार्मिक विधींची सुरुवात झाली. परमहंस भालचंद्र महाराजांच्या मूर्तीवर किरणोत्सवही करण्यात आला. हा सोहळा पाहताना अनेक भाविकांनी आपल्या डोळ्यांचे पारणे फिटल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. शहरातील तेलीआळी येथील सुदर्शन मित्रमंडळ, बाजारपेठेतील महापुरुष मित्रमंडळ, रिक्षा संघटना, शिवाजी चौक मित्रमंडळ तसेच इतर अनेक मंडळांनी पालखी मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहार तसेच चहा-पाण्याची सोय केली होती.

नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा सुबक अशी रांगोळी काढली होती. विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. अनेक मंडळांनी परमहंस भालचंद्र महाराजांच्या जीवनावरील देखावेही पालखी मिरवणुकीच्या मार्गावर चौका-चौकात उभारले होते. त्यामुळे शहरातील संपूर्ण वातावरणच भक्तिमय बनले होते.

पालखी मिरवणूक रात्री पुन्हा आश्रमात आल्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर हळवल येथील श्री भालचंद्र दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग झाल्यावर या पुण्यतिथी उत्सवाची सांगता करण्यात आली. या पुण्यतिथी महोत्सवासाठी गोवा, मुंबई, पुणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील अनेक भाविक कणकवलीत दाखल झाले होते.

वारकऱ्यांच्या साथीने सवाद्य पालखी मिरवणूकरविवारी सायंकाळी ५.३० वाजल्यानंतर कणकवली शहरातून परमहंस भालचंद्र्र महाराज यांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घोडे, उंट तसेच वारकऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या पालखी मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते. भाविकांनी केलेल्या भालचंद्र्र नामाच्या जयघोषाने कणकवलीनगरी दुमदुमून गेली होती.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBhalchandra maharaj temple Kankavaliभालचंद्र महाराज मंदिर कणकवली