शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

दिग्गजांसाठी अस्तित्वाची लढाई

By admin | Updated: April 10, 2015 00:27 IST

जिल्हा बँक निवडणूक : विक्रमी अर्ज दाखल, काँग्रेस आघाडी विरोधात सेना युतीमध्ये संघर्ष

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या होत असलेल्या पुढील पाच वर्षांच्या निवडणुकीसाठी १९ जागांकरीता १२५ उमेदवारांनी अर्ज भरले असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या इतिहासात एवढे अर्ज पहिल्यांदाच आले असून ही निवडणूक जिल्ह्यातील काही दिग्गजांसाठी अस्तित्वाची ठरणार असल्याने यावेळी या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. खरी लढत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरोधात शिवसेना-भाजपप्रणित युतीमध्ये होणार हे चित्र स्पष्ट होत आहे.गेल्या सात वर्षानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक पुढील पाच वर्षांच्या कालावधीकरीता ५ मे रोजी होत असून या निवडणुकीसाठी १९ जागांकरीता १२५ जणांनी अर्ज भरले आहेत. जिल्ह्यातील अनेक दिग्गज या निवडणुकीत उतरले आहेत.शेती उत्पादकांच्या संस्था मतदारसंघात जास्त अर्जशेती उत्पादकांच्या संस्था मतदारसंघात सर्वात जास्त अर्ज आले असून यामध्ये कणकवली तालुक्यातून सतीश सावंत (एकच अर्ज), सावंतवाडी तालुक्यातून जॅकी सेलेस्तिन डिसोजा, अनंत पांढरे, मेघश्याम काजरेकर, गुरुप्रसाद नाईक, प्रकाश परब, दत्ताराम वारंग, घाब्रियल आल्मेडा, विकास नाईक, दोडामार्ग तालुक्यातून विकास सावंत, दिलीप मयेकर, मोहन देसाई, गणेशप्रसाद गवस, प्रकाश गवस, कुडाळ तालुक्यातून पुष्पसेन सावंत, संदीप राऊळ, राजन परब, प्रकाश मोर्ये, सुभाष मडव, वैभववाडी तालुक्यातून दिलीप रावराणे, दिगंबर पाटील, रमेश तावडे, वेंगुर्ला तालुक्यातून विद्याधर प्रभू, राजन गावडे, दत्ताराम नाईक, मनिष दळवी, मालवण तालुक्यातून आशिष परब, व्हिक्टर डान्टस, बाळकृष्ण कांबळी तर देवगड तालुक्यातून प्रकाश बोडस आणि अविनाश माणगांवकर यांचा समावेश आहे. शेती उत्पादकांच्या संस्था मतदारसंघाच्या सावंतवाडी निवडणुकीमध्ये दत्ताराम वारंग विरूद्ध प्रकाश परब अशी लढत रंगणार तर कुडाळमध्ये पुष्पसेन सावंत, प्रकाश मोर्ये व सुभाष मडव यांच्यात तिरंगी लढत रंगेल. मालवणमध्ये व्हिक्टर डान्टस, दोडामार्गमध्ये विकास सावंत, देवगडमध्ये प्रकाश बोडस यांचे भवितव्य ठरणार आहे. कणकवलीत एकच अर्ज सतीश सावंत यांचा असल्याने ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा सदस्य मतदारसंघाचा विचार केल्यास एकूण पाच अर्ज आले असले तरी खरी लढत ही विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे पदाधिकारी आत्माराम ओटवणेकर विरूद्ध नकुल पार्सेकर यांच्यात रंगणार आहे. इतर मागासवर्गीय मतदारसंघात खरी रंगत येणार आहे. कारण याठिकाणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, विद्यमान संचालक विद्याप्रसाद बांदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे याचबरोबर रमण वायंगणकर, दिलीप आचरेकर या दिग्गजांमध्ये लढत होणार आहे.गेल्यावेळी काँग्रेसमधून निवडणूक लढून संचालक तसेच जिल्हा बँक अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेले राजन तेली यांनीही यंदा भाजपामधून नागरी सहकारी बँका-पतपुरवठा संस्था मतदारसंघातून अर्ज भरला असून त्यांच्या विरोधात सात उमेदवार असून तेली आपले संचालकपद टिकवू शकतील काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)अनेक दिग्गजांची कसोटीया निवडणुकीत माजी आमदार पुष्पसेन सावंत, राजन तेली, बँकेचे विद्यमान अध्यक्ष डी. बी. वारंग, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, कमलताई परुळेकर, प्रकाश परब, विलास गावडे, संदीप कुडतरकर तसेच विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज भरल्याने या निवडणुकीत अनेक दिग्गजांची कसोटी लागणार हे मात्र निश्चित.विकास सावंतांसाठी अटीतटीची लढतविद्यमान संचालक विकास सावंत यांनी सभासद संस्था-व्यक्ती सभासद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्याकरीताही ही निवडणूक अटीतटीची ठरणार आहे. विणकर गृहनिर्माण मतदारसंघातून विद्यमान संचालक आर. टी. मर्गज तर विमुक्त भटक्या जाती-जमातीमधून गुलाबराव चव्हाण, औद्योगिक उत्पादन संस्था मतदारसंघातून अतुल काळसेकर, प्रशांत सावंत, गजानन गावडे, मेघनाद धुरी रिंगणात आहेत.आघाडी सोडून राहिलेले महायुतीतकाँग्रेस-राष्ट्रवादीने आपली आघाडी असल्याचे जाहीर केले तर शिवसेना व भाजपाच्या नेत्यांनी शिवसेना-भाजप तसेच सहकार क्षेत्रातील इतर समविचारी उमेदवारांना आपल्या युतीत घेऊन महायुती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.